नागपूरचे मावळे निघाले रायगडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:24+5:302021-03-21T04:08:24+5:30
- शिवतीर्थ ते रायगड सायकलवारी : शिवजयंतीला करतील महाराजांना अभिवादन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय पंचांगानुसार येणाऱ्या शिवजयंतीला ...
- शिवतीर्थ ते रायगड सायकलवारी : शिवजयंतीला करतील महाराजांना अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय पंचांगानुसार येणाऱ्या शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी नागपुरातून दहा तरुण-तरुणींची चमू थेट सायकलवारीने रायगडाकडे निघाली आहे. शनिवारी या सायकलवारीस प्रारंभ झाला.
धाडस ग्रुपचे वर्ष घाटाळे, रक्षा राहुलकर, प्रियंका वैद्य, धनश्री भोयर, निहारिका लांडगे, सुमित शरणागत, अविनाश कटरे, शुभम मुंडले, निशांत निंदेकर, अनिरुद्ध सोल अशा पाच मुली व पाच मुले साधारणत: एक हजार किलोमीटरचा हा प्रवास सायकलद्वारे करणार आहेत. स्त्री शिक्षण, महाराजांच्या कार्याचा प्रसार, सायकलिंगला प्रोत्साहन, गडकिल्ल्यांबाबत जागृती, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, हागणदारीमुक्त गाव संदेश, पाणीसंवर्धन, वृक्षसंवर्धन, वायुप्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी ही सायकलवारी आहे. महाल येथील शिवतीर्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या सायकलवारीस प्रारंभ झाला. यावेळी श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने नीरजा पाटील यांनी सर्व मावळ्यांचे औंक्षण केले. आ. मोहन मते यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून या अभियानास सुरुवात झाली. याप्रसंगी दिलीप दिवटे, महेश महाडिक, दत्ता शिर्के, जय आसकर, विनोद गुप्ता, पंकज धुर्वे, मोहित येडे, प्रज्वल काळे, देवेंद्र घारपेंडे, वेदांत नाथे उपस्थित होते.
...........