वाहून गेलेल्या बसमध्ये नांदेडमधून बसले होते 8 जण, उमरखेडवरूनही काही प्रवासी बसल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 01:58 PM2021-09-28T13:58:30+5:302021-09-28T14:06:33+5:30

एसटीच्या वाहनचालकाला होता 24 वर्षांचा अनुभव, नागपूर नांदेड मार्गावर 15 वर्षापासून देत होता सेवा...

May be Eight passengers from Nanded and some passengers from Umarkhed were also on board the Drowned bus | वाहून गेलेल्या बसमध्ये नांदेडमधून बसले होते 8 जण, उमरखेडवरूनही काही प्रवासी बसल्याची शक्यता

वाहून गेलेल्या बसमध्ये नांदेडमधून बसले होते 8 जण, उमरखेडवरूनही काही प्रवासी बसल्याची शक्यता

googlenewsNext

नागपूर- नांदेडवरून नागपूरकडे येताना उमरखेड समोरील पुलावरून वाहून गेलेल्या बसमध्ये नांदेडवरून बसलेल्या आठ प्रवाशांची नोंद एसटी महामंडळाच्या जीपीएस प्रणाली वरून झाली आहे. या बसमध्ये उमरखेड वरून पुन्हा किती प्रवासी बसले याची मात्र नोंद नाही. यामुळे बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, यासंदर्भात अद्याप निश्चित माहिती नाही.

नागपूरचे विभाग नियंत्रक नरेंद्र बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस घाटरोड डेपोची असून वाहन चालक सतीश रंगप्पा सूरेवार (53) आणि  कंडक्टर भिमराव लक्ष्मण नागरीकर (56) हे सेवेत होते. काल रात्री 10 वाजता प्रवासी घेऊन हे दोघेही नांदेडला निघाले होते. यानंतर, मंगळवारी सकाळी 05:18 वाजता ही बस नांदेडवरून निघाली. तिकीट मशीनला जोडलेल्या जीपीएस प्रणाली नुसार या बसमध्ये आठ प्रवासी होते. त्यातील 4 हदगाव व 4 प्रवासी दिग्रसला उतरणारे होते. उमरखेडवरून ही बस 7.30 वाजता दिग्रसमार्गे नागपूरकडे निघाली. हे घटनास्थळ उमरखेड पासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असल्याने किती प्रवाशांचे बुकिंग झाले हे मात्र कळू शकलेले नाही.

Video : वाहत गेलेल्या बसचा व्हिडिओ व्हायरल, मदतीसाठी युवकांच्या लगेचच पाण्यात उड्या

एसटी चालकाला 24 वर्षाच्या सेवेचा अनुभव - 
एसटी चालक सतीश सूरेवार यांना एसटी महामंडळामध्ये 24 वर्षांच्या सेवेचा अनुभव आहे. 1997 मध्ये ते महामंडळात रुजू झाले होते. त्यांच्या हाताने एकही अपघात घडल्याची नोंद नाही. मागील 15 वर्षापासून नागपूर- नांदेड या मार्गावरील सेवेचा त्यांना अनुभव होता. काल रात्री याच मार्गावरून बस नेताना त्यांना नाल्याला फारसा पूर दिसला नसावा. यामुळे परत येताना ओव्हर कॉन्फिडन्समुळे त्यांनी ही बस पुलावरून टाकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

केबिनमध्ये तीन प्रवासी मृतावस्थेत
एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य केले. तीन जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर केबिनमध्ये पुन्हा 3 जण मृतावस्थेत दिसत असल्याची माहिती आहे. बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
 

Web Title: May be Eight passengers from Nanded and some passengers from Umarkhed were also on board the Drowned bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.