मेयो, मेडिकल व विद्यापीठ वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:18 AM2017-09-19T00:18:00+5:302017-09-19T00:18:22+5:30
सरकारी रुग्णालयात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या मुद्यावरून गेल्यावर्षी निवासी डॉक्टरांंनी केलेल्या ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारी रुग्णालयात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या मुद्यावरून गेल्यावर्षी निवासी डॉक्टरांंनी केलेल्या संपामुळे मेयो, मेडिकलसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ‘महाराष्टÑ सुरक्षा दला’चे (एमएसएफ) जवान तैनात करण्यात आले होते. यात काही बंदूकधारीही होते. सुमारे सहा महिन्यांच्या सेवेनंतर सोमवारपासून अचानक हे जवान संपावर गेल्याने गोंधळ उडाला आहे. पोलीस विभागाप्रमाणे सोई मिळण्याच्या मागणीला घेऊन हा संप पुकारण्यात आल्याचे समजते.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (मेडिकल) स्वत:चे सुरक्षा रक्षक आहेत. परंतु त्यांची तोकडी संख्या व सुरक्षेचे प्रशिक्षण प्राप्त नसल्याने रुग्णालयात डॉक्टरांवरील हल्ले वाढल्यावर बोट ठेवत गेल्यावर्षी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता.
अखेर शासनाने रुग्णालयांना सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी महाराष्टÑ सुरक्षा दलावर टाकली. सैनिकांच्या गणवेशासारखा पोषाख असलेले हे जवान हातात काठ्या घेऊन रुग्णालयात तैनात झाले. त्यांच्यामुळे काही प्रमाणात अनुचित घटनेला आळा बसला होता. परंतु त्यांना दिले जाणारे वेतन व इतर सोर्इंना घेऊन धूसफूस सुरू होती. अखेर सोमवारी सकाळपासून पोलीस विभागाप्रमाणे सोई मिळण्याच्या मागणीला घेऊन ‘महाराष्टÑ सुरक्षा दला’चे सर्व जवान संपावर गेले. यात मेयोमधील सुमारे ६६ तर मेडिकलमधील ७२ जवानांचा समावेश आहे. केवळ या दलाचे चार-पाच वरिष्ठ अधिकारी कामावर होते. अचानक सुरक्षा जवान संपावर गेल्याने मेयो, मेडिकल वाºयावर पडले आहे. निवासी डॉक्टरांसोबतच रुग्णांमध्ये असुरक्षितेचे वातावरण आहे.