पीएम केअरमधून मेयो, मेडिकलला मिळाले १९० व्हेंटिलेटर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:07 AM2021-05-14T04:07:36+5:302021-05-14T04:07:36+5:30
पीएम केअरमधून मिळालेले व्हेंटिलेटर्स : पीएम केअर फंडातून मेडिकलला ५०, तर मेयोला १४० असे एकूण १९० व्हेंटिलेटर मिळाले. ...
पीएम केअरमधून मिळालेले व्हेंटिलेटर्स : पीएम केअर फंडातून मेडिकलला ५०, तर मेयोला १४० असे एकूण १९० व्हेंटिलेटर मिळाले. यातील सात व्हेंलिटेर खासगी हॉस्पिटलला देण्यात आले.
बंद (खराब) व्हेंटिलेटर्स : मेयोत ३१ नादुरुस्त आहेत. मेडिकलमध्ये ५० व्हेंलिटरमधून १०ची ट्रायल सुरू असून, यातील काही अचानक बंद पडत असल्याचे सांगण्यात येते.
वापराविना पडून असलेले व्हेंटिलेटर्स : मेडिकलमध्ये ४० व्हेंलिटेर वापराविना डब्यातच बंद आहेत.
बंद-खराब पडलेल्यांचा थोडक्यात तपशील : मेयोला मिळालेल्या १४० व्हेंटिलेटरमधून १३ व्हेंटिलेटर मिळाले तेव्हा ते खराबच होते. सध्या बंद असलेल्या ३१ व्हेंटिलेटरची दुरुस्तीचे काम कंपनीला देण्यात आले आहे. मेडिकलमध्ये ५०मधील दहा व्हेंटिलेटर ट्रायल स्वरुपात सुरू असून, यातील काही अचानक बंद पडत असल्याचे व ऑक्सिजन पुरवठा अचानक कमी होत असल्याचे निदर्शनात आल्याची माहिती आहे.
तंत्रज्ञ नाही : मेयो, मेडिकलमध्ये तंत्रज्ञची पदे भरलेली आहेत.