मेयो, मेडिकलचे कर्मचारी मंगळवारपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:12 AM2018-08-07T00:12:26+5:302018-08-07T00:13:58+5:30

विविध मागण्यांना घेऊन मेयो, मेडिकलचे वर्ग ३ व ४ चे कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत. याचा फटका रुग्णालयाला बसणार नसला तरी प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. ७ ते ९ आॅगस्टपर्यंत चालणाऱ्या या संपातून मात्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना (मॅग्मो) व परिचारिकांच्या नर्सिंग संघटनेने माघार घेतली आहे.

Mayo, medical staff goes on strike from Tuesday | मेयो, मेडिकलचे कर्मचारी मंगळवारपासून संपावर

मेयो, मेडिकलचे कर्मचारी मंगळवारपासून संपावर

Next
ठळक मुद्देनर्सिंग व मॅग्मो संघटनेची माघार : प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध मागण्यांना घेऊन मेयो, मेडिकलचे वर्ग ३ व ४ चे कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत. याचा फटका रुग्णालयाला बसणार नसला तरी प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. ७ ते ९ आॅगस्टपर्यंत चालणाऱ्या या संपातून मात्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना (मॅग्मो) व परिचारिकांच्या नर्सिंग संघटनेने माघार घेतली आहे.
मेडिकलमध्ये वर्ग ३ चे सुमारे ५०० तर वर्ग ४ चे ४०० कर्मचारी आहेत. हे सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाज तीन दिवसांसाठी ठप्प पडण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार, दीड महिन्यापूर्वीच कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याची नोटीस प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने काय उपाययोजना केली, यासंदर्भात मेडिकलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारणा केली असता, त्यांनी ‘नोटीस’ मिळाली नसल्याचे उत्तर दिले.
नर्सेस टीचर्स असोसिएशनही संपापासून दूर
‘महाराष्ट्र  गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशन’ने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ‘ग्रॅज्युएट नर्सेस टीचर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्रच्या शिष्टमंडळा’ने संपापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णसेवा प्रभावित होणार नसल्याचे दिसून येत आहे. मात्र कर्मचारी संघटनेच्या मंगळवारपासून होणाऱ्या संपाला मॅग्मो संघटनेसह या दोन्ही संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

Web Title: Mayo, medical staff goes on strike from Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.