महापौर व स्थायी समिती अध्यक्षांनी केली जळीत हॉस्पिटलची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:38 AM2019-01-10T00:38:32+5:302019-01-10T00:39:40+5:30
श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स चौकातील निर्माणाधीन हॉस्टिलच्या इमारतीला बुधवारी दुपारीच्या सुमारास आग लागली. यात १२ कामगार गुदमल्याने बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष आग लागलेल्या जागेची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स चौकातील निर्माणाधीन हॉस्टिलच्या इमारतीला बुधवारी दुपारीच्या सुमारास आग लागली. यात १२ कामगार गुदमल्याने बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष आग लागलेल्या जागेची पाहणी केली. प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी महापौरांना आगीविषयी संपूर्ण माहिती देत आग नियंत्रणात आल्याचे सांगितले. किंग्ज वे मार्गावर किंग्ज वे हॉस्पीटलच्या इमारतीचे कार्य सुरू आहे. याच इमारतीचा मागील भाग परवाना ट्रस्टचा आहे. त्यांचे ऑडिटोरियमचे कार्य सुरू होते. येते गॅस वेल्डींगसह अनेक कामे सुरू होते. यामुळे आग लागल्याची माहिती दिली.निमार्णाधीन इमारतीमध्ये अग्निशमन नियमाप्रमाणे पाईप, शॉवर पाईपचे काम झालेले होते. मात्र पाण्याच्या पाईपला जोडले नव्हते.
आगीची घटना ही मोठी आहे. इमारत निमार्णाधीन असल्याने आणि तेथे केवळ मजूर असल्याने मोठी दुर्घटना टळली. मजुरांनीही वेळीच प्रसंगावधान दाखवून आपले जीव वाचवले. याचदरम्यान अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविता आले. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी धूर, उष्णता आणि गुदरमण्यासारखी परिस्थिती असतानाही अग्निशमन विभागाचे जवान तेथे आत शिरून परिस्थितीवर नियंत्रण मिळवित आहे. जीवावर उदार होऊन सेवा करणाऱ्या अग्निशमन विभागातील सर्व अधिकारी, स्थानाधिकारी व जवानांचे कार्य कौतुकास आणि अभिनंदनास पात्र आहे. असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाच मार्ग असल्याने कामगार सुखरुप
निर्माणाधीन हॉस्पिटल व ऑडिटोरियमला बाहेर पडण्यासाठी पाच मार्ग असल्याने आग लागल्यानंतर कामगारांना बाहेर पडता आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळली. बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असता तर कामगार आतमध्ये अडकले असते. सुदैवाने पाच मार्गामुळे ही अशी घटना घडली नाही.