स्वच्छता कर्मचाºयांसोबत महापौरांची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 01:17 AM2017-10-21T01:17:43+5:302017-10-21T01:18:05+5:30

स्वच्छ आणि सुंदर नागपूर ही सफाई कामगारांची देण आहे. स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून ते शहराची स्वच्छता करतात. त्यामुळे महापौर नंदा जिचकार यांची सफाई कर्मचाºयांसोबत दिवाळी साजरी केली.

Mayor of Diwali with cleanliness staff | स्वच्छता कर्मचाºयांसोबत महापौरांची दिवाळी

स्वच्छता कर्मचाºयांसोबत महापौरांची दिवाळी

Next
ठळक मुद्देनागपूरचा स्वच्छ चेहरा ही सफाई कामगारांची देण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ आणि सुंदर नागपूर ही सफाई कामगारांची देण आहे. स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून ते शहराची स्वच्छता करतात. त्यामुळे महापौर नंदा जिचकार यांची सफाई कर्मचाºयांसोबत दिवाळी साजरी केली. पाडव्याच्या निमित्ताने महापौरांनी आपली सकाळ स्वच्छता कर्मचाºयांसोबत घालविली. त्यांना मिठाईचे वाटप केले.
तात्या टोपे नगरातील सभागृहात दिवाळी मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, महापौरांचे विशेष कार्य अधिकारी विलास फडणवीस, झोनल अधिकारी राम तिडके उपस्थित होते. यावेळी महापौर जिचकार म्हणाल्या, महापौर म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर स्वच्छ आणि सुंदर नागपूर हेच आपले स्वप्न आहे. ते साकार करण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. कचºयाचा परिणाम आरोग्यावर होतो. साथीचे रोग अस्वच्छतेमुळे पसरतात. त्यामुळे आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे. स्वच्छता कर्मचारी आपली जबाबदारी नेटाने पार पाडत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेऊ, असे त्यांनी आश्वस्त केले.
सफाई कर्मचाºयांचा सत्कार
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही सफाई कर्मचाºयांचा महापौर जिचकार यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आरोग्य निरीक्षक ऋषिकेश इंगळे, अजय सूर्यवंशी, अशोक देशभ्रतार, आशीष बोरकर, राजू नंदेश्वर, सुशीलाबाई, आशीष काडगे, सरिता तांबे, अशोक गायकवाड, भीमराव सोनपिंपळे, बाळूजी मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रदीप दासरवार यांचाही महापौरांनी सत्कार केला.

नागरिकांनी कचरा
कमी करावा
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जनतेचे सहकार्य हवे. जनतेने कचरा कमी करायला हवा. ओला आणि सुका कचरा स्वतंत्र ठेवायला हवा. बाजार परिसरात सकाळी ७ वाजताच्या आत स्वच्छता व्हायला हवी, अशी अपेक्षा या वेळी स्वच्छता कर्मचाºयांनी व्यक्त केली.

Web Title: Mayor of Diwali with cleanliness staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.