कचºयाचा खर्च वाढला तरी महापौरांना माहीतच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:43 AM2017-11-17T01:43:35+5:302017-11-17T01:43:45+5:30
स्वच्छतेच्या बाबतीत उपराजधानीचा क्रमांक घसरला आहे. स्वच्छतेत सुधारणा झाल्याशिवाय स्मार्ट सिटीचे स्वप्न साकार होणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छतेच्या बाबतीत उपराजधानीचा क्रमांक घसरला आहे. स्वच्छतेत सुधारणा झाल्याशिवाय स्मार्ट सिटीचे स्वप्न साकार होणार नाही. याचा विचार करता कचरा उचलण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा, यावर होणारा खर्च याची माहिती महापालिकेच्या प्रमुख म्हणून महापौरांना असणे अपेक्षित आहे.
परंतु कचरा उचलण्याच्या खर्च ७.३३ कोटींनी वाढला आहे. यासंदर्भात महापौर नंदा जिचकार यांना माहीत नाही. एवढेच नव्हे तर रा.कृ . पाटील यांचे नाव असलेल्या रस्त्याचे नामांतर करून सर कस्तूरचंद डागा असे नाव देण्याच्या प्रस्तावाबाबतही आपण अनभिज्ञ असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी प्रश्नाच्या उत्तरात गुरुवारी पत्रकारांना दिली. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. यातून सावरण्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याची गरज आहे.
नुसत्या शासन अनुदानावर विसंबून न राहता महापालिकेला उत्पन्नात वाढ करावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. उत्पन्नाचे स्रोत व होणारा खर्च याची माहिती पदाधिकाºयांना असणे अपेक्षित आहे. मात्र कनक रिसोर्सेसला देण्यात येणाºया रकमेची माहिती महापौरांना नाही.
४३ कोटींच्या खर्चाला मंजुरी
शहरातील कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेडला वर्षाला २७ कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मागील सहा महिन्यात ३४.३३ कोटीची रक्कम देण्यात आली आहे. अतिरक्ति खर्च म्हणून ७.३३ कोटी देण्याला, पुढील सहा महिन्यात होणारा खर्च म्हणून ३५ कोटी तर मार्च २०१८ पर्यंत अंदाजे ४५ कोटींच्या खर्चाला गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच व्यवस्थित काम करीत नसल्यास कनक रिसोर्सेसवर दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिली.
कनक रिसोर्सेसला शहरातील कचरा उचलण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. पाच वर्षासाठी १३५ कोटींच्या खर्चाला मंजुरी आहे. परंतु रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्याने ७.३३ कोटींची वाढीव रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावरकर यांनी दिली. वास्तविक कनक रिसोर्सेला देण्यात आलेल्या बिलावर लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदविले आहे. नगरसेवकांचाही कनकवर रोष आहे. परंतु दुसरा कंत्राटदार नियुक्त होईपर्यंत कनकला तूर्त कोणताही पर्याय नसल्याचे चित्र आहे.