बाजारात फिरून महापौरांनी केली जनजागृती()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:11 AM2021-02-28T04:11:19+5:302021-02-28T04:11:19+5:30

नागपूर : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता ...

Mayor raises awareness in market () | बाजारात फिरून महापौरांनी केली जनजागृती()

बाजारात फिरून महापौरांनी केली जनजागृती()

Next

नागपूर : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले होते. याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. नागरिकांनीही घरीच राहणे पसंत केले.

दोन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी इतवारी आणि गोकुळपेठ बाजारांचा दौरा केला. इतवारीतील दुकाने बंद असल्याचे दिसून आले. अनेक भाजी, फळविक्रेत्यांनी मास्क परिधान केलेले नव्हते. त्यांना महापौरांनी मास्क परिधान करण्याचे आवाहन केले. यानंतर पुन्हा मास्कविना आढळले तर दंड ठोठावण्याचे निर्देश सोबत असलेल्या उपद्रव शोध पथकाला त्यांनी दिले. जे मास्कविना आढळतात अशा विक्रेत्यांना प्रथम समज द्या, जनजागृती करा, त्यानंतरही ते ऐकत नसतील तर दंड आकारा, असे निर्देश त्यांनी दिले.

बंदला दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापौरांनी आभार व्यक्त केले. यावेळी गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, गोकुळपेठ बाजारातील दौऱ्यात धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेवक संजय बंगाले उपस्थित होते. शनिवार आणि रविवारी बाजारात प्रचंड गर्दी होते. या गदींमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याचा संभव असतो. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा प्रशासनाने दोन दिवस बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नागपुरातील बहुतांश सर्वच व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती.

...

जिल्हा प्रशासनाने समन्वय ठेवावा

महापौर दयाशंकर तिवारी यांना काही वाईन शॉप सुरू असल्याचा दूरध्वनी आला. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता दारूच्या घरपोच सेवेला परवानगी असल्याचे सांगितले. जर मनपा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर दारूची दुकानेही बंद असावीत कारण ती अत्यावश्यक सेवेत येत नाहीत. यासाठी जिल्हाधिकारी यांनी मनपा प्रशासनाशी समन्वय ठेवून निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

Web Title: Mayor raises awareness in market ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.