महापौर संदीप जोशी आणखी एका संकटात; झाली कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 12:30 PM2020-12-10T12:30:38+5:302020-12-10T12:31:22+5:30
Nagpur News Sandip Joshi विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभवाचा झटका बसलेल्या महापौर संदीप जोशी यांना आणखी एक धक्का बसला आहे. जोशी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभवाचा झटका बसलेल्या महापौर संदीप जोशी यांना आणखी एक धक्का बसला आहे. जोशी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
नागपुरात कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर जोशी दोनदा कोरोना पॉजिटीव्हच्या संपर्कात आले होते व त्यांनी खबरदारी म्हणून स्वतःला क्वारंटाईन केले होते. मात्र त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. मात्र आताची त्यांची चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. मागील आठ महिन्यांपासून कोरोनाशी लढा सुरू असताना माझा आता अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. मी वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करावी, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार सुरु झाले आहेत. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.
— Sandip Joshi (@SandipJoshiNGP) December 10, 2020