महापौरांना दिसले खड्डे, बुजविण्याचे दिले निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:10 AM2021-09-18T04:10:04+5:302021-09-18T04:10:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांचे अस्तित्वच संपले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांचे अस्तित्वच संपले आहे. असे असतानाही मनपा प्रशासन दुसऱ्या विभागाकडे बोट दाखवत असून, स्वत:च्या जबाबदारीपासून पळत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे निर्देशही दिले आहेत. मात्र, मनपाचे संबंधित विभाग याबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.
ही बाब बघता, महापौर तिवारी यांनी आज बोलाविलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना बेजबाबदारपणावर इशारा दिला. सोबतच झोननिहाय खड्ड्यांचे समीक्षण केले. या खड्ड्यांची प्राथमिकता निश्चित करून, ते भरण्याचे काम मनपाच्या हॉटमिक्स प्लांट विभागाने करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. विभागाच्या दाव्यानुसार खड्डे बुजविण्याचे काम झोन स्तरावर सुरू झाले आहेत. महापौरांच्या निर्देशानुसार धरमपेठ झोनमध्ये रामनगर परिसरात ९६ चौ. मीटरचे १४ खड्डे बुजविण्यात आले आहेत. हनुमाननगर झोनमध्ये पिपळा फाटा मार्गावर २४ खड्डे, मंगळवारी झोनमध्ये नारा घाट रोडवर ७५ खड्डे हॉटमिक्स प्लांट विभागाकडून बुजविण्यात आले आहेत.
.....................