डेंग्यूच्या प्रकोपावरून महापौरांना घेराव()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:25+5:302021-09-02T04:19:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी महापालिका मुखयालय परिसरात ...

Mayor surrounded by dengue outbreak () | डेंग्यूच्या प्रकोपावरून महापौरांना घेराव()

डेंग्यूच्या प्रकोपावरून महापौरांना घेराव()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी महापालिका मुखयालय परिसरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फॉगिंग केले. गोवऱ्या जाळून धूर केला. तसेच महापौर दयाशंकर तिवारी यांना घेराव घातला.

मनपा प्रशासन शहरातील कचऱ्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. महापौरांना शहरातील नागरिकांची चिंता नाही. मनपाच्या झोन कार्यालयात फॉगिंग मशीन नाहीत. असा दावा आंदोलकांनी केला. यामुळे शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. कोविड नंतर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप केला. महापौरांनी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

आंदोलनान शहर युवक काँंग्रेसचे उपाध्यक्ष वसीम खान, अक्षय हेटे, रौनक चौधरी, फजलुर्रहमान कुरैशी, संदीप देशपांडे, अक्षय डोर्लीकर, सुमित ढोलके, कुणाल समुंद्रे, शुभम तलहर, कुणाल फुले, अंकित बंसोड, फिरोज खान, सोनू कुबडे पंकज बालपांडे, ऋषभ जैश,नकील अहमद यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Mayor surrounded by dengue outbreak ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.