महापौरांची न्यूट्रीशन क्लबवर धाड ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:09 AM2021-02-25T04:09:40+5:302021-02-25T04:09:40+5:30

कोरोनाच्या दिशानिर्देशाचे उल्लंघन : हेल्थ ड्रिंक विक्रेत्याला २५ हजाराचा दंड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी ...

Mayor's raid on Nutrition Club () | महापौरांची न्यूट्रीशन क्लबवर धाड ()

महापौरांची न्यूट्रीशन क्लबवर धाड ()

Next

कोरोनाच्या दिशानिर्देशाचे उल्लंघन : हेल्थ ड्रिंक विक्रेत्याला २५ हजाराचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी सकाळी जुना सुभेदार ले-आऊट, शारदा चौक येथील इम्युनिटी बूस्टर हेल्थ ड्रिंक विकणाऱ्या क्लबमध्ये धाड टाकली. या क्लबमध्ये कोरोनाच्या दिशानिर्देशाचे पूर्णत: उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने क्लब संचालकाला २५ हजाराचा दंड ठोठावला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, हनुमाननगर झोनच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे आणि उपद्रव शोध पथकाचे जवान होते.

शारदा चौक येथील एका छोट्याशा खोलीत नागरिकांना दावा करून कोरोना प्रतिबंधक इम्युनिटी बूस्टर काढा व ड्रिंक दिले जात असल्याची माहिती महापौरांना मिळाली होती. क्लबचे सुमित मलिक यांनी काढा घेतल्यानंतर मास्क लावण्याची गरज नसल्याचा दावा केला होता. येथे महापौरांनी धाड टाकली असता, ४५० वर्गफुटाच्या खोलीत १५० पेक्षा जास्त लोक जमा असल्याचे दिसून आले. यापैकी कुणीही मास्क घातलेला नव्हता. सामाजिक अंतराचे पालन होत नसल्याने महापौरांनी उपद्रव शोध पथकाच्या जवानांना दंड लावण्याची सूचना केली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकल्यामुळे महापौरांनी संचालकाला फटकारले. अशाप्रकारे नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या संस्थेच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले.

राम जोशी यांच्या निर्देशानुसार पथकाच्या जवानांनी सुमित मलिक यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला. महापौर आणि शोध पथकाच्या जवानांना पाहताच क्लबमधील नागरिकांनी पळ काढला.

...

बेजबाबदारपणा धोकादायक ठरू शकतो

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकाराची भीती दिसत नाही, ही चिंतेची व अत्यंत धोकादायक बाब आहे. नागरिकांचा थोडासा बेजबाबदारपणा हा कुणाच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे स्वत:सह इतरांनाही धोका ठरू नये यासाठी प्रत्येकाने शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

Web Title: Mayor's raid on Nutrition Club ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.