छट पूजा व्यवस्थेचा महापौरांनी घेतला आढावा
By admin | Published: October 28, 2014 12:24 AM2014-10-28T00:24:42+5:302014-10-28T00:24:42+5:30
छट पूजेला अंबाझरी व फुटाळा तलाव परिसरात गर्दी होते. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी तलाव परिसराची
तलावांची पाहणी : सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश
नागपूर : छट पूजेला अंबाझरी व फुटाळा तलाव परिसरात गर्दी होते. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी तलाव परिसराची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी आमदार सुधाकर देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्यासह मनपातील पदाधिकारी उपस्थित होते.
तलाव परिसरात भाविकांना सुविधा उपलब्ध कराव्यात. होणारी गर्दी विचारात घेता भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दटके यांनी दिले. छट पूजानिमित्ताने मनपातर्फे अंबाझरी व फुटाळा तलावावर पेंडॉल, बॅरिकेटस्, लेव्हलिंग व विद्युत व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच तलावातील शेवाळ, झाडेझुडपे काढून सफाई करण्याचे निर्देश दटके यांनी दिले. माजी महापौर माया इवनाते, माजी उपमहापौर संदीप जाधव, धरमपेठ झोनच्या सभापती वर्षा ठाकरे, नगरसेविका मीना चौधरी, संजय बंगाले, झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, बबन अवस्थी, उत्तर भारतीय संघटनेचे ओमप्रकाश ठाकूर, राजेश्वर सिंग, विनोद बघेल, शिवपाल सिंग आदी उपस्थित होते. दरम्यान, उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी गोरेवाडा व पोलीस लाईन टाकळी तलावाला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. तलावावर पेंडॉल, बॅरिकेटस्, लेव्हलिंग व विद्युत व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच तलावातील शेवाळ, झाडेझुडपे काढून सफाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी सभापती सरस्वती सलामे, नगरसेवक भूषण शिंगणे, शीला मोहोड, सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)