मेयोची प्रशासकीय इमारत ७७ कोटींची : तीन वर्षांत होणार बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 09:51 PM2019-05-10T21:51:27+5:302019-05-10T21:52:56+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रशासकीय इमारतीसाठी ७७ कोटींच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. याच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. साधारण तीन वर्षांत ही इमारत मेयो प्रशासनाकडे हस्तांतरित होणार आहे. या इमारतीमधून अधिष्ठाता कार्यालयासह विविध विभागाचा प्रयोगशाळा, लेक्चर्स हॉल व ई-लायब्ररीचे कामकाज चालणार आहे. विशेष म्हणजे, या इमारतीमुळे ‘एमसीआय’ दरवर्षी काढत असलेल्या त्रुटी निकाली निघणार आहे.

Mayo's administrative building, 77 crore: Construction will be done in three years | मेयोची प्रशासकीय इमारत ७७ कोटींची : तीन वर्षांत होणार बांधकाम

ब्रिटीश कालीन असलेल्या या इमारतीच्या जागेवर मेयोची प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देअधिष्ठाता कार्यालयासह इतर विभागाचे कामकाज चालणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रशासकीय इमारतीसाठी ७७ कोटींच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. याच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. साधारण तीन वर्षांत ही इमारत मेयो प्रशासनाकडे हस्तांतरित होणार आहे. या इमारतीमधून अधिष्ठाता कार्यालयासह विविध विभागाचा प्रयोगशाळा, लेक्चर्स हॉल व ई-लायब्ररीचे कामकाज चालणार आहे. विशेष म्हणजे, या इमारतीमुळे ‘एमसीआय’ दरवर्षी काढत असलेल्या त्रुटी निकाली निघणार आहे.
मेयोे रुग्णालय १८६२ मध्ये ‘सिटी हॉस्पिटल’च्या नावाने सुरू झाले. नंतर महानगरपाकिलेने धर्मादाय दवाखाना म्हणून चालवायला घेतले. पुढे या रुग्णालयाची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आली. आज ‘मेयो’च्या नावाने विदर्भच नाहीतर आजूबाजूच्या पाच राज्यांमध्ये हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. ३८.२६ एकर मध्ये पसरलेल्या या रुग्णालयात काही अशा इमारती आहेत ज्यांचे वय शंभरीच्या पुढे गेले आहे. याला घेऊन न्यायालयाने ताशेरे ओढल्याने मेयोच्या प्रगतीची वाटचाल सुकर झाली आहे. गेल्या सहा वर्षाच्या कार्यकाळात बहुउद्देशीय इमारत, नवा आकस्मिक विभाग, मुलामुलींचे वसतिगृह, ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’ची इमारत उभी झाली. गेल्या तीन वर्षांपासून मेयो प्रशासन प्रशासकीय इमारतीसाठी प्रयत्न करीत असताना अखेर गेल्या वर्षी यश आले. बांधकामासाठी ७७ कोटी ६४ लाख ८० हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली.
प्रशासकीय इमारतीत असणार हे विभाग
मेयोचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रवी चव्हाण यांनी सांगितले, मेयोच्या प्रशासकीय इमारतीतून अधिष्ठाता कार्यालयाचे कामकाज चालणार आहे. सोबतच मायक्रोलॉजी, पॅथोलॉजी, फार्मेकोलॉजी व न्याय वैद्यकशास्त्र विभागाचा प्रयोगशाळांचा समावेश असणार आहे. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ई-लायब्ररी असणार आहे. सहा लेक्सर्च हॉल असतील, सोबतच कॅन्टीनसाठी स्वतंत्र जागा व तळमजल्यावर पार्किंगची सोय असणार आहे.
सव्वा दोन लाख स्केअर फुटमध्ये बांधकाम
डॉ. चव्हाण म्हणाले, साधारण सव्वादोन लाख स्क्वेअर फूटमध्ये प्रशासकीय इमारतीचे बांधकाम होणार आहे. तळमजल्यासह सहा मजलीची ही इमारत ‘ग्रीन बिल्डींग’ निकषावर आधारीत असणार आहे. तीन वर्षांत बांधकाम पूर्ण होणार आहे.
जुनी ओळख पुसली जाणार
मेयो मधील लाँड्री, ड्रग स्टोअर, फिओलॉजी विभागाची इमारत ही ब्रिटिशकालीन होती. या इमारती मोडकळीसही आली होती. प्रशासकीय इमारतीसाठी या इमारती तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, पूर्वीचे रॉबिट्सन मेडिकल स्कूल, नंतर वैद्यकीय अधीक्षकाचे कार्यालय असलेली इमारतही तोडण्यात आली आहे. या सर्व जुन्या आठवणींना तोडण्यापूर्वी अनेक माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये ‘सेव्ह’ करून ठेवला आहे.
प्रशासकीय इमारतामुळे ‘एमसीआय’चे निकष पूर्ण
मेयोला प्रशासकीय इमारत नसल्याने आतापर्यंत विविध इमारतीतून याचे कामकाज चालयाचे. यामुळे ताळमेळ बसत नव्हता. आता सहा मजलीच्या इमारतीतून प्रशासकीय कामकाज चालणार असल्याने याचा फायदा प्रशासनाला होईल. सोबतच या इमारतीमुळे ‘एमसीआय’चे निकष पूर्ण होतील.
डॉ. अजय केवलिया
अधिष्ठाता, मेयो

 

Web Title: Mayo's administrative building, 77 crore: Construction will be done in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.