मेयोच्या आग नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2015 02:56 AM2015-08-23T02:56:47+5:302015-08-23T02:56:47+5:30

मेयो रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. दुर्दैवाने येथे आगीची घटना घडलीच तर त्यापासून बचाव होईल अशी यंत्रणा असणे गरजेचे आहे.

Mayo's fire control system questioned! | मेयोच्या आग नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!

मेयोच्या आग नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!

Next

अग्निशमन विभाग : प्रमाणपत्र न घेता नवीन इमारतींचे बांधकाम
मेयो रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. दुर्दैवाने येथे आगीची घटना घडलीच तर त्यापासून बचाव होईल अशी यंत्रणा असणे गरजेचे आहे. असे असूनही बहुमजली इमारत व मुलींच्या वसतिगृहासाठी बांधकाम विभागाने अग्निशमन विभागाकडून परिपूर्णता प्रमाणपत्र घेतलेले नाही. अग्निशमन विभागाच्या गंजीपेठ स्टेशनकडून या संदर्भात मेयो प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली. परंतु मेयो प्रशासनाकडून यावर अहवाल पाठविल्याचे कळविण्यात आले. वास्तविक गंजीपेठ कार्यालयाकडून अद्याप अशा प्रकारचे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता अग्निशमन विभागाच्या मुख्यालयाकडून नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतरही परिपूर्णता प्रमाणपत्र न घेतल्यास रुग्णालयाचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.
मेयो रुग्णालयात सिटी स्कॅन, एक्स- रे मशीन यासह नवीन उपकरणे बसविण्यात आली आहेत. यासाठी उच्च दाबाच्या वीज वाहिनीची गरज असते. तसेच मेयो रुग्णालयाची इमारत व वायरिंग जुनी झाली आहे. ती बदलण्याची गरज आहे. अधिष्ठाता कार्यालय व एक्स-रे विभागात अनेकदा यापूर्वी आगीच्या घटना घडल्या आहे.(प्रतिनिधी)
नोटीस बजावणार
अग्निशमन विभागाच्या निकषानुसार बहुमजली इमारतीत आग नियंत्रणासाठी उपकरणे असणे आवश्यक आहे. यासाठी बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागाने निकषाची पूर्तता केल्याचा अहवाल अग्निशमन विभागाकडे सादर करणे आवश्यक असते. त्यानंतर विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. परंतु ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने नियमानुसार मेयो प्रशासनाला पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस बजावली जाणार आहे.
- राजेन्द्र उचके
प्रमुख अग्निशमन अधिकारी, मनपा

Web Title: Mayo's fire control system questioned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.