नागपूरमध्ये चार वर्षांच्या प्रयत्नानंतर युरोलॉजीमध्ये एमसीएच अभ्यासक्रम

By सुमेध वाघमार | Published: March 2, 2023 03:44 PM2023-03-02T15:44:12+5:302023-03-02T15:44:58+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल १९९८साली रुग्णसेवेत सुरू झाले.

MCH course in Urology after four years of effort in Nagpur | नागपूरमध्ये चार वर्षांच्या प्रयत्नानंतर युरोलॉजीमध्ये एमसीएच अभ्यासक्रम

नागपूरमध्ये चार वर्षांच्या प्रयत्नानंतर युरोलॉजीमध्ये एमसीएच अभ्यासक्रम

googlenewsNext

नागपूर - सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा 'युरोलॉजी' विभागात 'एमसीएच' हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा चार वर्षांच्या प्रयत्नाला अखेर यश आले. ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ने (एनएमसी) नुकत्याच केलेल्या पाहणीनंतर हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा शेरा दिला. ‘सुपर’ला पदव्युत्तर वैद्यकीय संस्था निर्माण करण्याचा प्रयत्नातील हे मोठे यश मानले जात आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल १९९८साली रुग्णसेवेत सुरू झाले. सध्या या हॉस्पिटलमधून हृदय शल्यचिकित्सा, (सिव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी),  मेंदूरोग (न्युरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्युरोसर्जरी), मूत्रपिंड विकार (नेफ्रालॉजी), मूत्र रोग (युरोलॉजी), पोटाचेविकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी) व ‘एन्डोक्रेनॉलॉजी’ अशा आठ विभागातून रुग्णसेवा दिली जाते. मागील २५ वर्षांपासून ‘सुपर’ला पदव्युत्तर वैद्यकीय संस्था तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु सरकारकडून आवश्यक ती मदत मिळत नसल्याने ‘कार्डिओलॉजी’, ‘गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी’ या दोनच विभागात ‘डीएम’ अभ्यासक्रम सुरू आहे. आता यात ‘युरोलॉजी’ विभागातील ‘एमसीएच’ अभ्यासक्रमाची भर पडणार आहे.
 

Web Title: MCH course in Urology after four years of effort in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर