मध्यरात्री दुचाकीवरील तरुणांकडून एमडी पावडर
By योगेश पांडे | Updated: June 6, 2024 16:24 IST2024-06-06T16:22:46+5:302024-06-06T16:24:17+5:30
Nagpur : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Two youths caught with MD powder
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने मध्यरात्रीनंतर दुचाकीवरील तरुणांकडून एमडी पावडर जप्त केली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामझुला मार्गावर ही कारवाई करण्यात आली.
योगेश गजाननराव खापरे (२५, कसारपुरा, तीननल चौक, इतवारी) व अक्षय बंडु वंजारी (२५, जुना बगडगंज, नंदनवन) अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी रात्री एक वाजताच्या सुमारास ते दुचाकीने रामझुल्यावरून खाली उतरले असता गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना अडविले. मेयो इस्पितळासमोर त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याजवळ १७.३० ग्रॅम एमडी पावडर सापडली. पोलिसांनी त्यांच्याकडून पावडर, मोबाईल व दुचाकी असा २.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांविरोधातही एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली.