भाजी विक्रीच्या नावाखाली एमडी तस्करी; १.५८ लाखाचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 09:57 PM2023-06-13T21:57:15+5:302023-06-13T21:57:41+5:30

Nagpur News भाजी विक्रीच्या आड एमडीची तस्करी करणाऱ्या युवकाला नंदनवन पोलिसांनी रंगेहाथ पडकले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १.५८ लाख रुपयांची एमडी जप्त केली आहे.

MD smuggling in the guise of selling vegetables; Goods worth 1.58 lakh seized | भाजी विक्रीच्या नावाखाली एमडी तस्करी; १.५८ लाखाचा माल जप्त

भाजी विक्रीच्या नावाखाली एमडी तस्करी; १.५८ लाखाचा माल जप्त

googlenewsNext


नागपूर : भाजी विक्रीच्या आड एमडीची तस्करी करणाऱ्या युवकाला नंदनवन पोलिसांनी रंगेहाथ पडकले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १.५८ लाख रुपयांची एमडी जप्त केली आहे. आरोपीचे नाव मो. नौशाद उर्फ राजा मो. इब्राहीम (२८, रा. बाबा फरीदनगर, खरबी) आहे.
राजा आठवडी बाजारात भाजीचा ठेला लावत होता. त्याला एमडीचे व्यसन आहे. भाजी विक्रीतून त्याचे एमडीचे व्यसन पूर्ण होत नव्हते. दरम्यान, त्याची एमडीचे व्यसन असलेल्यांशी ओळख झाली. त्यातूनच राजा एमडीची तस्करी करू लागला. आठवडी बाजारात दुकान लावत असल्याने त्याला ग्राहक सहज मिळत होते. बाजारात ग्राहकांची गर्दी होत असल्याने त्याच्यावर संशयही येत नव्हता. काही महिन्यांपासून तो एमडीची तस्करी करीत होता. नंदनवन पोलिसांना त्याच्यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली.

सोमवारी हसनबाग येथे आठवडी बाजारात तो एमडीची विक्री करीत होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याची झाडाझडती घेतल्यावर त्याच्याजवळून १५ ग्रॅम ८७ मिलिग्रॅम एमडी मिळाली. त्याची किंमत १.५८ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. राजा मोठ्या तस्करांकडून एमडी खरेदी करीत होता. पोलिस मोठ्या तस्करांचा पत्ता लावत आहे. हसनबागमध्ये एमडीच्या विक्रीबरोबर इतर मादक पदार्थ विक्रीचे अड्डे आहेत. हसनबागच्या आठवडी बाजारात गांजा विक्री तसेच सट्टादेखील चालतो. असामाजिक तत्व येथे सक्रिय आहेत. स्थानिक नागरिकांनी नंदनवन पोलिसांकडे तस्करी करणाऱ्यांविरूद्ध कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: MD smuggling in the guise of selling vegetables; Goods worth 1.58 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.