अर्थ अवर दिन; साैर ऊर्जा वापरात भारत ५ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 07:40 AM2021-03-27T07:40:14+5:302021-03-27T07:41:46+5:30

Nagpur news अपारंपरिक ऊर्जा स्त्राेतामधील प्रमुख स्त्राेत असलेल्या साैर ऊर्जेचा वापर भारतात वाढला आहे. देशात २०१४ मध्ये २.६३ गिगावॅट साैर ऊर्जा निर्मिती हाेत हाेती, जी वाढून आज ३६ गिगावॅटवर पाेहचली आहे. साैर ऊर्जेच्या वापरात भारत जगात पाचव्या स्थानी पाेहोचला आहे.

Meaning inferior day; India ranks 5th in renewable energy consumption | अर्थ अवर दिन; साैर ऊर्जा वापरात भारत ५ व्या स्थानी

अर्थ अवर दिन; साैर ऊर्जा वापरात भारत ५ व्या स्थानी

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पादन २.६३वरून ३६ गिगावॅटवर पाेहोचलेक्लायमेट चेंज इंडेक्समध्येही पहिल्या १०मध्ये

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : संपूर्ण जगात ऊर्जेचा वापरात आणि मागणीत मागील ५० वर्षांत १०० पटीपेक्षा अधिक प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पारंपरिक ऊर्जा स्त्राेतापासून निर्मित ऊर्जेचे प्रमाण आजही ८० टक्के (वीज) आहे. मात्र आता समाधानकारक माहिती ऊर्जा विभागाकडून मिळत आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्राेतामधील प्रमुख स्त्राेत असलेल्या साैर ऊर्जेचा वापर भारतात वाढला आहे. देशात २०१४ मध्ये २.६३ गिगावॅट साैर ऊर्जा निर्मिती हाेत हाेती, जी वाढून आज ३६ गिगावॅटवर पाेहचली आहे. साैर ऊर्जेच्या वापरात भारत जगात पाचव्या स्थानी पाेहोचला आहे.

भारताने २०१६ मध्ये पॅरिस ॲग्रीमेंटवर हस्ताक्षर केले हाेते. त्याचा मुख्य उद्देश जगात हाेणारे जल वायू परिवर्तन राेखणे हा आहे. त्याची समाधानकारक अंमलबजावणी भारताकडून हाेत असून गेल्या सहा वर्षात भारताची साैर ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे पवन ऊर्जेतही भारत अग्रेसर हाेत असून, पवन ऊर्जा वापरामध्ये भारत जगात चाैथ्या स्थानी पाेहोचला आहे. उल्लेखनीय म्हणजे क्लायमेट चेंज इंडेक्समध्ये भारत जगातील पहिल्या दहा देशांमध्ये शामील झाला आहे.

अर्थ अवर म्हणजे काय

ऊर्जेचा प्रचंड वापर आणि हाेणारे जलवायू परिवर्तन राेखण्याचे पाऊल म्हणून २००४ पासून अर्थ अवर साजरा केला जाताे. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हा दिवस साजरा हाेताे. भारतातही काही ठिकाणी ताे साजरा केला जाताे. त्यानुसार मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री एक तास विद्युत बंद केली जाते. नागपुरातही गेली काही वर्षे रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान वीज बंद करून दिवस साजरा केला जात आहे. मात्र गेल्या वर्षीपासून काेराेना प्रकाेपामुळे यामध्ये खंड पडला आहे.

नागपुरात २०१४ पासून तत्कालीन महापाैर अनिल साेले यांच्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जात आहे. पहिल्या वर्षी पाैर्णिमेच्या दिवशी ताे साजरा करण्यात आला. यानुसार नागपूर महापालिका व ग्रीन व्हिजील फाउंडेशनद्वारे रात्री ८ ते ९ वाजतादरम्यान अनावश्यक वीज उपकरण बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले जाते. या अभियानामुळे २,५०००० किलाे कार्बनचे उत्सर्जन थांबविण्यात यश आले आहे.

- काैस्तुभ चटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजील.

Web Title: Meaning inferior day; India ranks 5th in renewable energy consumption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthपृथ्वी