वनसेवेतील प्रभावी कार्यासाठी वनविभागाकडून पदके जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 03:25 PM2020-11-26T15:25:09+5:302020-11-26T15:27:52+5:30
Nagpur News Forest Department राज्यातील वन सेवेमध्ये विशेष प्रभावी कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहनासाठी पदके जाहीर करण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील वन सेवेमध्ये विशेष प्रभावी कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहनासाठी पदके जाहीर करण्यात आली आहेत. या अंतर्गत ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांची यासठी निवड करण्यात आली असून सुवर्ण आणि रजत पदकांनी या सर्वांचा गौरव केला जाणार आहे.
वनसेवेतील कार्य जोखीमीचे असते. निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी तसेच वन्यजीवांचे रक्षण करताना या कर्मचाऱ्यांना बरेचदा संकटाशी सामना करावा लागतो. वन संशोधनाच्या कार्यात या क्षेत्राधमध्ये वाव देखील आहे. या सर्व दृष्टीने नाविण्यपूर्ण आणि प्रभावी कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या पदके दिली जातात.
त्यांचे मनोधर्य वाढिवण्यासाठी तसेच प्रेरित व प्राोत्साहित करण्यासाठी वनसंरक्षण, वन्यजीव संरक्षण, शोधकार्य, वन व्यवस्थापन, नाविण्यपूर्ण शोध आदी कार्यासाठी हे पुरस्कार आहेत. यातील पात्र कर्मचाऱ्यांची निवड करताना मुख्य वस संक्षकांकडून नावांच्या शिफारशी मागविण्यात आली. कामांचे स्वरूप, सचोटी, गोपनिय अहवाल, चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता, बुद्धीमत्ता, विकसित केलेले तंत्रज्ञान याबद्दल विचार करून पदके प्रदान करण्यासाठी अपर मुख्य सचिव (वने) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची बैठक १३ मार्चला झाली होती. यातून या पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. या सर्वांना समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. ...
विदर्भातील गौरवपात्र वन- वन्यजीव संरक्षण :
वनरक्षक श्रेणी : प्रफुल्ल फरतोडे, अमरावती (सुवर्ण), व्ही. व्ही. हलगे, यवतमाळ (रजत), शिला खरात, अमरावती (रजत),
वनपाल श्रेणी : संदीप परिहार, अमरावती (सूवर्ण), राहूल चव्हाण, अमरावती (रजत),
सहाय्यक वनसंरक्षक श्रेणी :
अशोक पऱ्हाड, अमरावती (रजत)
वन- वन्यजीव व्यवस्थापन :
वनरक्षक श्रेणी : विरेंद्र उजैनकर, अमरावती (सुवर्ण), पुरूषोत्तम लाडे, गडचिरोली (रजत),
वनपाल श्रेणी : निलेश्वर वाडीघरे, नागपूर (रजत),
वनक्षेत्रपाल श्रेणी : पांडूरंग पखाले, नागपूर (सुवर्ण),
सहाय्यक वनसंरक्षक : विवेक मोरे, चंद्रपूर (रजत),
धाडसी, शौर्य, प्रगती कार्य :
वनमजूर : सतीश उमक, अमरावती (सुवर्ण),
पोलीस शिपाई : अजय मराठे, चंद्रपूर (रजत),
वनविस्तार :
वनपाल श्रेणी : विलास देशमुख, अमरावती (रजत)
...