मेडिकल : दारुच्या बॉटल्समुळे विभाग प्रमुख अडचणीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 09:09 PM2019-09-24T21:09:37+5:302019-09-24T21:10:46+5:30

मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयामागील भागात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्सचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेतली.

Medical: Department heads in trouble due to alcohol bottles | मेडिकल : दारुच्या बॉटल्समुळे विभाग प्रमुख अडचणीत 

मेडिकल : दारुच्या बॉटल्समुळे विभाग प्रमुख अडचणीत 

googlenewsNext
ठळक मुद्देअधिष्ठात्यांनी घेतली गंभीर दखल : विभाग प्रमुखांना विचारला जाब

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शासकीय रुग्णालयात किंवा कार्यालयात मद्यपान करणे हा गुन्हा ठरतो. मात्र सोमवारी चक्क मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयामागील भागात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्सचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेतली. या विषयी मंगळवारी विभाग प्रमुखांना पत्र देऊन जाब विचारला. यामुळे विभाग प्रमुख अडचणीत आले आहेत.
मेडिकलमध्ये विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. शिवाय रुग्णालयाचा परिसर फार मोठा असल्याने सुरक्षा रक्षकांना सर्वच ठिकाणी लक्ष देणे अशक्य असते. याचा फायदा घेत काही रुग्णांचे नातेवाईक व समाजविघातक रुग्णालयाच्या परिसरात दारू पितात. काही वर्षापूर्वी वॉर्डाच्या भागात दारुच्या रिकाम्या बॉटल्स सापडल्या. याची चर्चा झाल्याने सफाई कर्मचाऱ्यांनाही याबाबत जाब विचारण्यात आला होता. नंतर मुलांच्या वसतिगृहात दारुच्या बॉटल्स सापडल्यानेही मेडिकल चर्चेत आले होते. आता अधिष्ठाता कक्षाला लागून असलेल्या कार्यालयाच्या मागील परिसात कचºयाचा टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्स आढळून आल्याने पुन्हा एकदा उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. रात्रीच्यावेळी मेडिकलच्या परिसरात दारूच्या पार्ट्या चालत असाव्यात, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. या प्रकाराला अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश दिले आहे. मंगळवारी कार्यालयीन विभाग प्रमुखांना ‘वॉर्निंग लेटर’ देऊन या विषयी जाबही विचारण्यात आला. कार्यालयाच्या परिसरात कोणी कर्मचारी मद्यपान करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सूत्रानूसार, सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेजही तपासले जाणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Medical: Department heads in trouble due to alcohol bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.