मेडिकल फुल्ल! खाटांच्या तुलनेत ९१ टक्के रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:49 PM2018-09-17T23:49:25+5:302018-09-17T23:50:28+5:30

बदलत्या हवामानामुळे वाढलेले आजार, यातच डेंग्यू व स्क्रब टायफसच्या रुग्णांत वाढ झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सध्याच्या घडीला १४०० खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या ९१ टक्क्यांवर गेली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या ३०९८ तर दुपारी २ वाजेपर्यंत भरती झालेल्या रुग्णांची १८१ संख्या होती. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग (गायनिक), औषधवैद्यकशास्त्री विभाग (मेडिसीन), अस्थीरोग विभाग (आर्थाे) व शल्यचिकित्सा विभाग (सर्जरी) व बालरोग विभागातील (पेडियाट्रिक) बहुसंख्य खाटा फुल्ल झाल्या होत्या. काही विभागात एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवून उपचार सुरू होते.

Medical Full ! In comparison to cots About 91% patients | मेडिकल फुल्ल! खाटांच्या तुलनेत ९१ टक्के रुग्ण

मेडिकल फुल्ल! खाटांच्या तुलनेत ९१ टक्के रुग्ण

Next
ठळक मुद्दे आर्थाे, गायनिक, मेडिसीन, सर्जरी, पेडियाट्रीक विभागात खाटांच्यावर रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बदलत्या हवामानामुळे वाढलेले आजार, यातच डेंग्यू व स्क्रब टायफसच्या रुग्णांत वाढ झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सध्याच्या घडीला १४०० खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या ९१ टक्क्यांवर गेली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या ३०९८ तर दुपारी २ वाजेपर्यंत भरती झालेल्या रुग्णांची १८१ संख्या होती. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग (गायनिक), औषधवैद्यकशास्त्री विभाग (मेडिसीन), अस्थीरोग विभाग (आर्थाे) व शल्यचिकित्सा विभाग (सर्जरी) व बालरोग विभागातील (पेडियाट्रिक) बहुसंख्य खाटा फुल्ल झाल्या होत्या. काही विभागात एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवून उपचार सुरू होते.
बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. शहरात सर्वत्र ताप, खोकला, सर्दी व इतर आजारांची साथ सुरू आहे. शहराच्या सीमेरेषेवरील वसाहतीत डेंग्यसदृश्य व मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. स्वाईन फ्लू संशयितांचीही संख्या वाढत आहे. यातच स्क्रब टायफसने डोके वर काढल्याने या आजाराचे २१वर प्रौढ रुग्ण उपचार घेत आहेत. मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र वॉर्डातील खाटांची संख्या ३२० असताना ३३० च्यावर रुग्ण उपचार घेत आहेत. बालरोग वॉर्डातील खाटांची संख्या ८० असताना रुग्णाची संख्या ९० झाली आहे. या सोबतच नेहमीच गर्दीचा वॉर्ड असलेल्या अस्थिरोग वॉर्डही फुल्ल आहे. विशेष म्हणजे स्त्रीरोग वॉर्डात खाटांची संख्या १९० असताना रुग्णांची संख्या २५०वर गेली आहे. खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढल्याने मेडिकल प्रशासनाने ३० फोल्डिंग खाटांची खरेदी केली असून संबंधित विभागाला ते उपलब्ध करून दिले आहे.
औषधांचा तुटवडा
रुग्णांची संख्या वाढली असताना आवश्यक त्या प्रमाणात रुग्णालयात औषधे नाहीत. हाफकिन कंपनीकडून अद्यापही औषधांचा पुरवठा झाला नसल्याने अनेक औषधांचा तुटवडा पडला आहे. बाह्यरुग्ण विभागात तर नावालाही औषधे नाहीत. भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ऐनवेळी औषधांसाठी धावपळ करावी लागते, काहींवर पदरमोड करण्याची वेळ येते. वैद्यकीय शिक्षण विभागाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे अनेक वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Web Title: Medical Full ! In comparison to cots About 91% patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.