मेडिकल आॅक्सिजनवरच

By admin | Published: December 31, 2015 03:12 AM2015-12-31T03:12:31+5:302015-12-31T03:12:31+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय

Medical oxygen only | मेडिकल आॅक्सिजनवरच

मेडिकल आॅक्सिजनवरच

Next

डॉक्टरांचा संप, बाळाची अदलाबदल अन् बदल्या गाजल्या : ‘स्वाईन फ्लू’ ने घेतले बळी
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय (मेयो) व डागा स्मृती शासकीय रु ग्णालयात घडलेल्या विविध घटनांनी जुने वर्ष चांगलेच गाजले. मेडिकलमध्ये डॉक्टर व परिचारिकांचा संप, वॉर्डातील बाळाची झालेली अदलाबदल, एका विद्यार्थ्याने केलेला आत्महत्येचा प्रयत्न व यामुळे शासनाने मेडिकलच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांमुळे मेडिकल चांगलेच चर्चेत राहिले. मेयोमध्ये डॉक्टरला झालेली मारहाण यामुळे मेयोसुद्धा चर्चेत राहिले.

डिकल, मेयो, डागा, सुपर, कामगार रु ग्णालय ही शासकीय रु ग्णालये या-ना-त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहतात.‘एक्स-रे फिल्म’ संपल्यामुळे जानेवारी महिन्यात २० ते २५ दिवस रु ग्ण उपचारापासून वंचित राहिले. ‘स्वाईन फ्लू’ बळीत राज्यात नागपूर प्रथम असल्याची कबुलीच आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका भेटीदरम्यान दिली. ‘वॉर्डात भरती करायला सांगितल्यानंतर रु ग्णाला मात्र सुटी देण्यात आली’ या कारणावरून ‘सिनिअर व ज्युनिअर’ डॉक्टरांमध्ये चांगलीच जुंपली होती. केवळ ‘व्हेन्टिलेटर’ नसल्याचे कारण सांगून मेडिकलचे डॉक्टर मागील चार महिन्यांपासून ६५ वर्षीय वृद्ध रु ग्णावर शस्त्रक्रि याच करीत नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. याशिवाय एका २२ वर्षीय रु ग्णावर शस्त्रक्रि या न करताच त्याला सुटी देण्यात आल्याचा गंभीर प्रकारही उघडकीस आला. (प्रतिनिधी)
ते बाळ ‘त्याच’ महिलेचे
प्रसूत महिलेला मुलगा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर काही तासातच महिलेकडे मुलगी सोपविण्यात आली, असा आरोप कुटुंबीयांनी करून बाळांची अदलाबदल झाल्याचा प्रकार मेडिकलमध्ये समोर आला. यामुळे एकच खळबळ उडाली. बाळाचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर ती मुलगी महिलेचीच असल्याचे स्पष्ट झाले होते.
परिचारिकांचे कामबंद
सुपर स्पेशालिटी रु ग्णालयातील कोट्यवधींच्या मशिनवर तीन वर्षांपासून एकदाही रु ग्ण तपासणी झाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला. पगार वेळेवर होत नसल्याच्या कारणावरून मेडिकलमधील परिचारिकांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. तब्बल ५ ते ६ तास काम बंद आंदोलन करून प्रशासनाला घाम फोडला होता. अखेर आंदोलनाची दखल घेत प्रशासनाला परिचारिकांचा पगार वेळेवर करणे भाग पडले.
प्रशासनाकडून शासनाची फसवणूक
उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला मध्यरात्री दाखल करून न घेता मेडिकलच्या डॉक्टरांनी रु ग्णाला बाहेर हाकलून लावण्याचा प्रकारही समोर आला होता. ६ कोटी रु पयांच्या यंत्राची खरेदी १४ कोटी रु पयांत करण्यात आल्याचा गंभीर प्रकार मेडिकलमध्ये उघडकीस आला. प्रशासनाकडून शासनाची शुद्ध फसवणूक झाल्याचे यावरून दिसून आले होते. जीवघेण्या स्वाईन फ्लूमुळे नागपूर विभागात १७ दिवसात १७ रु ग्णांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. यावर्षी बालकांना मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्लूने घेरल्याचेही समोर आले होते.
निवासी डॉक्टर आत्महत्येचा प्रयत्न
एका विभागाचे प्रमुख मानिसकरीत्या छळ करीत असल्याचा आरोप करून एका निवासी डॉक्टर आत्महत्येचा प्रयत्न केला. याशिवाय लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप करीत एका विद्यार्थिनीनेही विभाग प्रमुखाविरोधात पोलिसात तक्र ार दाखल केली होती. या प्रकारामुळे नागपूरच्या मेडिकल रु ग्णालयाची राज्यभरात चांगलीच बदनामी झाली. यावर चौकशी समितीही बसली. परंतु, कारवाई होत नसल्यामुळे मार्डने राज्यभरात संप पुकारून शासनाचे लक्ष वेधले होते. यामुळे सरकारही हालले. परिणामी, विभागप्रमुखाची शासनाने बदली केली. सोबतच अधिष्ठाता व पुन्हा एका विभागप्रमुखाची बदली करण्यात आली. एकाच दिवशी मेडिकलच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. बदली झाल्यामुळे डॉक्टरांनी संप मागे घेतल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला होता. बदलीविरोधात अधिष्ठात्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
न्यायालयाने स्टे दिला. त्यानंतरही प्रकरण धुमसतच राहिले. या घटनेच्या पूर्वी घडलेल्या एका घटनेत एका निवासी डॉक्टरने एक विभागप्रमुख मानसिक छळ करीत असल्याचा आरोप केला होता. प्रशासनाने त्याची बदली केली होती.
मुख्य सचिवांची भेट
मेडिकलमधील प्रकरणे थांबत नाहीत तर, मेयो रुग्णालयातही एक वरिष्ठ डॉक्टर लैंगिक छळ करीत असल्याची लेखी तक्रार महिलेने अधिष्ठात्यांकडे केली होती. या प्रकरणाचा आगडोंब उसळला नसला तरी वैद्यकीय शिक्षण विभागापर्यंत ही तक्रार पोहोचली होती. मेडिकलच्या डॉक्टरांनी एका बालिकेला शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्यांदा टाके लावल्याचा संतापजनक आणि तेवढाच गंभीर प्रकार समोर आला होता. राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला भेट देऊन रखडलेले ‘ट्रामा केअर सेंटर’ जानेवारीत सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. मेडिकलमध्ये स्वच्छतेविषयी आमूलाग्र बदल घडवून शिस्तबद्धपणा आणण्याचा अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी केलेला प्रयत्न प्रसंशनीय ठरला. काही चांगल्या गोष्टी वगळात वाईट गोष्टींमुळेच मेडिकल वर्षभरात चर्चेत राहिले, हे विशेष.

Web Title: Medical oxygen only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.