मेडिकल : ‘टेलिमेडिसीन’मधून सात हजार रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:07 PM2019-07-30T23:07:58+5:302019-07-30T23:09:34+5:30

दुर्गम भागातच नव्हे तर खेड्यापाड्यात विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टर नाहीत. येथील रुग्ण प्रथम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवितात. तेथील उपचारांनी फरक न पडल्यास मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये येतात. यात पैशांची सोय न झाल्यास वा सोबतीला कुणी नसल्यास बराच उशीर होतो. त्यामुळे रोग बळावतो. अनेकवेळा हाताबाहेरही जातो. मात्र, टेलिमेडिसीनमुळे ही परिस्थिती सुधारतेय. रुग्णाला त्यांच्या गावाजवळच विशेषज्ञाकडून उपचार होत असल्याने हा प्रकल्प रुग्णांसाठी संजीवनी ठरतोय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) या प्रकल्पात गेल्या तीन वर्षात टेलिमेडिसीनच्या माध्यमातून सात हजार रुग्णांना उपचाराला घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

Medical: Seven thousand patients treated with 'telemedicine' | मेडिकल : ‘टेलिमेडिसीन’मधून सात हजार रुग्णांवर उपचार

मेडिकल : ‘टेलिमेडिसीन’मधून सात हजार रुग्णांवर उपचार

googlenewsNext
ठळक मुद्देदुर्गम व खेड्यापाड्यातील रुग्णांना विशेषज्ञांकडून मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुर्गम भागातच नव्हे तर खेड्यापाड्यात विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टर नाहीत. येथील रुग्ण प्रथम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवितात. तेथील उपचारांनी फरक न पडल्यास मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये येतात. यात पैशांची सोय न झाल्यास वा सोबतीला कुणी नसल्यास बराच उशीर होतो. त्यामुळे रोग बळावतो. अनेकवेळा हाताबाहेरही जातो. मात्र, टेलिमेडिसीनमुळे ही परिस्थिती सुधारतेय. रुग्णाला त्यांच्या गावाजवळच विशेषज्ञाकडून उपचार होत असल्याने हा प्रकल्प रुग्णांसाठी संजीवनी ठरतोय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) या प्रकल्पात गेल्या तीन वर्षात टेलिमेडिसीनच्या माध्यमातून सात हजार रुग्णांना उपचाराला घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.
आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना आरोग्यसेवा देणे म्हणजे, टेलिमेडिसीन. यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रुग्णाशी संवाद साधला जातो. याशिवाय विशेष तंत्रज्ञानामुळे ई स्टेथोस्कोपद्वारे रुग्णाच्या हृदयाचे ठोके आणि फुफ्फुसाचे कार्य ऐकण्याची सोय आहे. रुग्णाचे एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एमआरआय विशिष्ट सॉफ्टवेअरने पाठवताही येतात. या शिवाय रुग्णाचे ईसीजी, ईको, अँजिओग्राफी थेट पाहण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे गडचिरोलीतील दुर्गम भागातील रुग्णांच्या चाचण्यांची माहिती, सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन उपचार केला जात आहे. या प्रकल्पाची सुरुवात २००९ मध्ये मेडिकलमध्ये झाली. सुरुवातीला ही योजना ढेपाळली. मात्र २०१३-१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे, ४९१९ रुग्णांना उपचारविषयक मार्गदर्शन करण्यात आले. २०१४-२०१५ मध्ये टेलिमेडिसीनच्या जागेला घेऊन बराच गोंधळ उडाल्याने हे केंद्र बंद पडल्यासारखेच होते. जुलै २०१६ पर्यंत ही स्थिती होती. परंतु त्यानंतर ‘फॅसिलीटी मॅनेजर’ची जागा भरताच गेल्या गेल्या तीन वर्षांत सात हजार दोन रुग्णांच्या समस्या सोडविण्यात आल्या.
११ केंद्रांवरील रुग्णांवर होतो उपचार
गडचिरोली जिल्ह्याच्या तीन, गोंदिया, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा ११ केंद्रांवरील रुग्णांवर टेलिमेडिसीनच्या मदतीने उपचार केले जात आहे. या केंद्रावरील डॉक्टरांना रुग्णांच्या उपचाराला घेऊन काही शंका असल्यास त्याचे निदान नागपूर मेडिकलमधील तज्ज्ञ डॉक्टर करतात. यात हृदयरोग, कान-नाक-घसा, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती, कॅन्सर,अस्थिरोग, शस्त्रक्रियांसह उर्वरित विभागांशी संबंधित रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
४८९ कैद्यांना मिळाला उपचार
मध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्यांनाही ‘टेलिमेडिसीन’द्वारे मेडिकल डॉक्टरांची वैद्यकीय सेवा दिली जात होती. यासाठी मध्यवर्ती कारागृह व मेडिकल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडण्यात आले होते. आजारी कैद्याला कारागृहातील इस्पितळामध्ये दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी निदान न झाल्यास तेथील डॉक्टर मेडिकलमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधत. आजारी कैद्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवून उपचाराची दिशा ठरवली जायची. जून २०१८ पासून या कार्याचा प्रारंभ झाला. परंतु सहा महिन्यातच ‘कॉल’ येणे बंद झाले. या कालावधीमध्ये ४८९ कैदी रुग्णांना लाभ मिळाल्याची माहिती आहे.

 

Web Title: Medical: Seven thousand patients treated with 'telemedicine'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.