मेडिकल : कोरोना रुग्णांना सेवा देण्यास कर्मचाऱ्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 07:42 PM2020-05-12T19:42:48+5:302020-05-12T19:46:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा देण्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक नकार दिल्याने प्रशासन अडचणीत आले. वरिष्ठांनी ...

Medical: Staff refuses to serve Corona patients | मेडिकल : कोरोना रुग्णांना सेवा देण्यास कर्मचाऱ्यांचा नकार

मेडिकल : कोरोना रुग्णांना सेवा देण्यास कर्मचाऱ्यांचा नकार

Next
ठळक मुद्देप्रशासनाने केली पर्यायी व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा देण्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक नकार दिल्याने प्रशासन अडचणीत आले. वरिष्ठांनी या संदर्भात कठोर निर्णय घेत नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच काढून टाकले. त्या जागी पर्यायी व्यवस्था केली. यामळे रुग्ण सेवा पुन्हा सुरळीत झाली.
मेडिकलमध्ये रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. नवे विभाग, नवे वॉर्ड स्थापन झाले आहेत. सध्याच्या स्थितीत मेडिकल, ट्रॉमा केअर सेंटर व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमिळून खाटांची संख्या सुमारे तीन हजारावर गेली आहे. परंतु येथील मनुष्यबळाची संख्या पूर्वीच्या १४०० खाटांनुसारच आहे. यामुळे मेडिकल प्रशासनाला अनेक समस्यांला तोंड द्यावे लागते. अटेन्डंट व सफाई कर्मचाºयांची मोठ्या संख्येत पदे रिक्त असल्याने रुग्णालय प्रशासनाला रुग्ण सेवा देणे अडचणीचे जाते. यावर पर्याय म्हणून दोन वर्षांपूर्वी अटेन्डंटच्या कामाचे व सफाईचे दोन वेगवेगळ्या कंपनीला कंत्राट दिले. मेडिकल प्रशासनाचे महिन्याकाठी यावर लाखो रुपये खर्च होतात. यातील क्रिस्टल कंपनीच्या ३२ तर अभिजीत कंपनीच्या २४ सफाई कर्मचाऱ्यांची ड्यूटी कोविड हॉस्पिटलमध्ये लावण्यात आली होती. परंतु यातील काही कर्मचाऱ्यांनी अचानक कोरोना रुग्णांची सेवा देण्यास नकार दिला. यामुळे रुग्णसेवा अडचणीत आली. वरिष्ठांनी तातडीने नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून त्या ठिकाणी रुग्णालयातील व महाविद्यलयाच्या भागातील कर्मचाऱ्यांना पुढील एक महिन्यासाठी तैनात केले. यामुळे तूर्तास तरी समस्या निकाली निघाली आहे. कंपनी आपली वेळेवर जबाबदारी विसरत असल्याने रुग्णालय प्रशासन वारंवार अडचणीत येते. यावर कायम तोडगा काढणे प्रशासनासाठी आवश्यक असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

Web Title: Medical: Staff refuses to serve Corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.