वैद्यकीय विद्यार्थिनींच्या दुचाकी पेटवल्या

By admin | Published: June 2, 2016 08:14 PM2016-06-02T20:14:43+5:302016-06-02T20:14:43+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) विद्यार्थिनींच्या दहा वाहनांना बुधवारी मध्यरात्री पेटवून दिल्याने खळबळ उडाली.

Medical students have lit a bike | वैद्यकीय विद्यार्थिनींच्या दुचाकी पेटवल्या

वैद्यकीय विद्यार्थिनींच्या दुचाकी पेटवल्या

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 2-  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) विद्यार्थिनींच्या दहा वाहनांना बुधवारी मध्यरात्री पेटवून दिल्याने खळबळ उडाली. वसतिगृह क्रमांक दोनमध्ये घडलेल्या या प्रकरणांमुळे संपूर्ण मेडिकल हादरले असून, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे नाशिक, पुणे या दोन शहरात दुचाकी जाळण्याचा घटना ताज्या असताना आता नागपुरातही हा प्रकार घडल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. 
महाराष्ट्रासह इतरही राज्यातून शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मेडिकलमध्ये येतात. येथे एमबीबीएसचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी दोन तर विद्यार्थिनींसाठी दोन वसतिगृह आहेत. अधिष्ठाता कार्यालयाच्या अगदी जवळच असलेल्या मुलींच्या वसतिगृह क्रमांक २ मध्ये हा प्रकार घडला. या वसतिगृहामध्ये साधारण शंभरांवर विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था आहे.  रात्री १० नंतर वसतिगृहाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले जाते. सर्वांची वाहने मुख्य द्वाराच्या आत उभी केली जातात. गुरुवारी पहाटे साधारण २.३० वाजताच्या सुमारास एका विद्यार्थिनीला आगीचे लोळ निघताना दिसले. तिने लागलीच आरडा-ओरड करीत इतरांना याची माहिती दिली. विद्यार्थिंनीनी अग्निशमन दलाला फोन केला. यावेळी वसतिगृहाच्या सुरक्षेसाठी मेडिकल प्रशासनाकडून केवळ एकच सुरक्षारक्षक तैनात होता.
 
त्यालाही या प्रकाराबद्दल माहिती नव्हते. आगीचे लोळ पाहून बाजूच्या वसतिगृहातील मुले धावून आली. त्यांनी इतर वाहने सुरक्षितस्थळी हलवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग एवढी मोठी होती की त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाचे वाहन पाहचले. त्यांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले, परंतु तोपर्यंत ९ दुचाकी खाक झाल्या होत्या तर एका दुचाकीची सीट जळाली. 
 
 
- प्रेम प्रकरणाचा संशय !
प्रेमप्रकरणातून ही घटना घडली तर नसावी हा धागा पकडूनही पोलीस तपास करीत असल्याची माहिती आहे. मेडिकलच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे. दहा वर्षांपूर्वी मेडिकलच्याच एका विद्यार्थिनीवर तिच्याच मित्राने चाकूने हल्ला केला होता. या घटनेला घेऊन मेडिकलचे इतरांसाठी असलेले प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. 

Web Title: Medical students have lit a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.