नागपुरातील वैद्यकीय विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 10:22 AM2019-06-08T10:22:04+5:302019-06-08T10:23:09+5:30

सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाचा कोटा (ईडब्ल्यूएस) रद्द करताना विविध निर्देश दिलेत. त्यात सुधारणा करण्यासाठी शहरातील काही वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन अर्ज दाखल केले आहेत.

Medical students of Nagpur in Supreme Court | नागपुरातील वैद्यकीय विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात

नागपुरातील वैद्यकीय विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात

Next
ठळक मुद्देईडब्ल्यूएस कोटा आदेशात सुधारणेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाचा कोटा (ईडब्ल्यूएस) रद्द करताना विविध निर्देश दिलेत. त्यात सुधारणा करण्यासाठी शहरातील काही वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन अर्ज दाखल केले आहेत.
अर्जदारांमध्ये सागर सारडा, समीर देशमुख व इतरांचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या पर्यायामध्ये बदल करण्याची व रद्द झालेल्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाच्या कोट्यातील जागांसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती एका अर्जात करण्यात आली आहे. यापुढे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाविषयीची कोणतीही याचिका वा अर्ज कोणत्याही न्यायालयात ऐकला जाणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. दुसऱ्या अर्जाद्वारे यावर स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. दोन्ही अर्जावर शुक्रवारी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यांनी प्रकरणावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. दरम्यान, राज्य सरकारने दोन्ही अर्जांना विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे दोन्ही अर्जांवर सुनावणी घेता येणार नाही असे सरकारने सांगितले.

Web Title: Medical students of Nagpur in Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.