रामटेक उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय साहित्याची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:41+5:302021-05-01T04:07:41+5:30
रामटेक : रामटेक तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णावरील उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे शासकीय उपजिल्हा ...
रामटेक : रामटेक तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णावरील उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू नयेत यासाठी जिल्हा काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर उपजिल्हा रुग्णालयाला मिनी व्हेंटिलेटर, तसेच कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध करून दिली. यात प्रामुख्याने मिनी व्हेंटिलेटर, सॅनिटायझर, फेस मास्क शिल्ड, टेम्प्रेचर गन, ऑक्सीमीटर, स्टिमर मशीन, एन-९५ मास्क, हॅण्डग्लोज यांचा समावेश आहे. यावेळी माजी पंचायत समिती सभापती कलावती ठाकरे, रामटेक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल कोठेकार, सुशांत राळे, सागर धावडे आदी उपस्थित होते.