मेडिकल : रुग्णाच्या जेवणात की डब्यात शेणसदृश गोळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:39 PM2019-06-20T23:39:10+5:302019-06-20T23:44:03+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून (मेडिकल) रुग्णाला दिल्या जाणाऱ्या जेवणात एका रुग्णाला शेणसदृश गोळा आढळून आल्याने खळबळ उडाली. रुग्णालय प्रशासनाने याच्या चौकशीचे आदेश दिले आहे. अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलच्या पाकगृहाची पाहणी करून अन्नाचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठविले आहे. विशेष म्हणजे, जेवणात शेण असूच शकत नाही, असे मेडिकल प्रशासनाचे म्हणणे आहे. तो गोळा शेण, मातीचा की खऱ्याचा वाळलेला चोतरा हे अद्यापही निष्पन्न झाले नाही. महत्त्वाचे म्हणजे, रुग्णाच्या डब्यातच आधीपासून हा गोळा असावा, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून (मेडिकल) रुग्णाला दिल्या जाणाऱ्या जेवणात एका रुग्णाला शेणसदृश गोळा आढळून आल्याने खळबळ उडाली. रुग्णालय प्रशासनाने याच्या चौकशीचे आदेश दिले आहे. अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलच्या पाकगृहाची पाहणी करून अन्नाचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठविले आहे. विशेष म्हणजे, जेवणात शेण असूच शकत नाही, असे मेडिकल प्रशासनाचे म्हणणे आहे. तो गोळा शेण, मातीचा की खऱ्याचा वाळलेला चोतरा हे अद्यापही निष्पन्न झाले नाही. महत्त्वाचे म्हणजे, रुग्णाच्या डब्यातच आधीपासून हा गोळा असावा, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
मेडिकलच्या अस्थिव्यंगोपचार विभागाच्या वॉर्ड क्रमांक दोन मधील खाट क्रमांक २० वर मागील दहा दिवसांपासून उमेश पवार हा रुग्ण भरती आहे. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास रुग्णांना जेवण देणारी गाडी वॉर्डासमोर आली. वॉर्डाच्या परिचारिकेने तिच्याकडील भांड्यामध्ये पोळी, पालकाची भाजी, भात आदी पदार्थ भरून घेतले. रुग्णांनी हे जेवण घेऊन जाण्याचा सूचना दिल्या. पवार यांनी स्वत:कडील डब्यात हे जेवण घेतले. रात्री ११ वाजता जेवण करीत असताना घासात काहीतरी चुकीचे आले, असे लक्षात आले. त्याने तेवढा भाग कागदात गुंडाळून ठेवला. दुसऱ्या दिवशी बुधवारी ११ वाजता या संदर्भातील तक्रार वॉर्डातील इन्चार्ज सिस्टरकडे केली. त्यांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला याची माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी गुरुवारी चौकशीचे आदेश दिले. हे वृत्त बाहेर येताच अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलच्या किचनची पाहणी केली. वॉर्डातील इतर रुग्णांकडून जेवणाबाबत माहिती घेतली. सोबतच अन्नाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले.