नागपूर विभागातील मध्यम आणि लहान तलावही ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 10:36 AM2019-09-16T10:36:02+5:302019-09-16T10:37:33+5:30

मागील काही दिवसात नागपूर व परिसरासह मध्यप्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील धरणे भरली आहेत.

Medium and small lakes in Nagpur region also have 'overflow'. | नागपूर विभागातील मध्यम आणि लहान तलावही ‘ओव्हरफ्लो’

नागपूर विभागातील मध्यम आणि लहान तलावही ‘ओव्हरफ्लो’

googlenewsNext
ठळक मुद्दे३७३ पैकी २६१ भरली६ मोठे, २४ मध्यम, २३१ मामा व लघु तलावांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसात नागपूर व परिसरासह मध्यप्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील धरणे भरली आहे. विभागात लहान, मोठी अशी एकूण ३७३ तलाव आहेत. यापैकी २६१ तलाव पूर्ण भरले आहे. यामध्ये ६ मोठे प्रकल्प, २४ मध्यम तर २३१ लघु व मामा तलावांचा समावेश आहे.
नागपूर विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी सध्या २४ प्रकल्प पूर्ण भरली आहे. जिल्हानिहाय विचार केल्यास नागपूर जिल्ह्यात एकूण १३ मध्यम प्रकारची तलावं आहेत. यापैकी चंद्रभागा, उमरी, कन्होलीबारा, पांढराबोडी, मकरधोकडा, सायकी, जाम आणि कार अशी ८ तलाव १०० टक्के भरली आहेत. एकूण तलावांची तुलना केल्यास ८३.४८ टक्के भरली आहेत. भंडारा जिल्ह्यातील एकूण ४ मध्यम तलावांपैकी चांदपूर हे १०० टक्के भरले. तर बधेडा हे ८३.९५ टक्के भरले आहे. एकूण ८४.४२ टक्के तलाव भरली आहेत. गोंदिया जिल्ह्यात १० मध्यम तलाव आहेत. यापैकी रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी हे तलाव १०० टक्के भरले आहेत. तर बोदलकसा ९३.१६ टक्के, उमरझरी ९४.४९ टक्के, कालपाथरी ९०.५९ टक्के भरली आहेत. एकूण प्रकल्प ८०.२२ टक्के भरले आहेत. वर्धा जिल्ह्यात ५ मध्यम स्वरूपातील तलाव आहेत. यापैकी लालनाल, मदन उन्नेयी, डोंगरगाव व पंचधारा तलाव १०० टक्के भरली. आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ८ मध्यम स्वरूपाचे तलाव असून यापैकी घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड, अमलनाला, पकडीगुड्डम आणि डोंगरगाव ही सर्व तलावे १०० टक्के भरली आहेत. मध्यम तलावांचा एकूण पाणीसाठा क्षमता ५३७.४८ दलघमी आहे. यात आजच्या घडीला ४७३.३० दलघमी म्हणजे ८८.०६ टक्के पाणी जमा झाले आहे. विभागात एकूण ३१४ लघु व मामा तलाव आहेत. यापैकी २३१ तलाव काठोकाठ भरली आहेत.
मोठे प्रकल्प ८०.४० टक्के भरले
नागपूर विभागातील मोठे प्रकल्प ८०.४० टक्के इतके भरले आहेत. विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ३५५२.३६ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला २८५५.९४ दलघमी म्हणजे ८०.४० टक्के पाणी जमा झाले आहे. यामध्ये इटियाडोह, असोलामेंढा, दिना, धाम, पोथरा ही पाच धरणे १०० टक्के भरली आहेत. तर तोतलाडोह ९६.९२ टक्के, खैरी ९७.९७ टक्के, वणा ९२.८६ टक्के, पुजारी टोला ९३.४३ टक्के, कालीसरार ९०.६९ टक्के, लोअर वर्धा ९१.१६ टक्के भरली आहेत.

Web Title: Medium and small lakes in Nagpur region also have 'overflow'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी