पाण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार :पालकमंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 09:06 PM2019-01-14T21:06:55+5:302019-01-14T21:10:28+5:30

शहरात पाण्याची टंचाई नाही. मे,जून महिन्यात संभाव्य टंचाई लक्षात घेता पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मध्य प्रदेश (एम.पी.) चे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

Meet the Chief Minister of Madhya Pradesh for water: Guardian Minister Bawankule | पाण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार :पालकमंत्री बावनकुळे

पाण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार :पालकमंत्री बावनकुळे

Next
ठळक मुद्दे पाच टीएमसी अतिरिक्त पाण्याची मागणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात पाण्याची टंचाई नाही. मे,जून महिन्यात संभाव्य टंचाई लक्षात घेता पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मध्य प्रदेश (एम.पी.) चे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
जलसंपत्ती प्राधिकरणाकडून पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात आला आहे. त्यामुळे नदीतून जास्त पाण्याची उचल करता येत नाही. पेच प्रकल्पात पर्याप्त पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासणार सध्यातरी नाही. येणाऱ्या काळात ती निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील धरण ९५ टक्के भरले आहे. पुढील वर्षीही पाणी अडविण्यात येणार आहे. त्यांच्याकडे अतिरिक्त पाणी होणार आहे. उन्हाळ्यात टंचाई लक्षात घेता पेचसाठी पाच टीएमसी पाणी सोडण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घण्यात येणार आहे. त्यांना सर्व स्थितीची माहिती देण्यात येईल. शहरात पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पाण्याचा ‘लॉस’ मोठ्या प्रमाणात होत आहे. हा लॉसेस कमी करण्याची गरज आहे. महानगर पालिकेने याकडे लक्ष दिले पाहिजे. विहिरी आणि बोअरवेल दुरुस्त केले पाहिजे, असेही ते म्हणाले. पाण्याच्या वितरणाची जबाबदारी ओसीडब्ल्यू कंपनीकडे देण्यात आली. त्यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही. यासाठी अनेक कारण जबाबदार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीही त्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोराडी वीज प्रकल्पाला आता पिवळी नदीचेही पाणी
वीज प्रकल्प पूर्णपणे प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर यावेत, असे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नागनदीचे पाणी कोराडी वीज प्रकल्पासाठी वापरले जाते. आता पिवळी नदीतील पाणीही वापरण्यात येणार आहे. यासाठी उप्पलवाडी येथे मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title: Meet the Chief Minister of Madhya Pradesh for water: Guardian Minister Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.