पटोलेंना सक्षम पर्याय देण्याची तयारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 05:06 AM2018-01-29T05:06:34+5:302018-01-29T05:06:59+5:30

नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे होऊ घातलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी सुरू केली असून रविवारी ‘रामगिरी’ येथे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांची बैठक घेत आढावा घेतला.

 The meeting of the Chief Minister took place, preparing to give an alternative to POLLENNA | पटोलेंना सक्षम पर्याय देण्याची तयारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

पटोलेंना सक्षम पर्याय देण्याची तयारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Next

नागपूर : नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे होऊ घातलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी सुरू केली असून रविवारी ‘रामगिरी’ येथे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांची बैठक घेत आढावा घेतला.
नाना पटोले यांनी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवरही सातत्याने टीका केली. मात्र, फडणवीस यांनी त्यांच्या एकाही टीकेला उत्तर दिले नाही. त्यामुळे भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाºयांमध्ये अस्वस्थता वाढत चालली होती. अशातच पटोले यांनी फडणवीस हे भंडारा-गोंदियाची पोटनिवडणूक लढतील तर आपण त्यांच्या विरोधात लढू, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आणखीनच रोष वाढला होता. मात्र, पक्षाकडून कुणीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र दिसत असल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. ही अस्वस्थता ओळखून शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भंडारा-गोंदियाचे मिशन हाती घेतले.
बैठकीत पटोलेंच्या जागी कोण, यावर चर्चा झाली. चर्चेत पदाधिकाºयांनी बाहेरून उमेदवार आयात करू नये, अशी भूमिका मांडली. पक्षासाठी अनेक वर्षांपासून झटणारे जुने निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पक्षातूनच योग्य व्यक्तीला उमेदवारी द्यावी, आम्ही सर्व त्याच्या पाठीशी राहू, असे मत पदाधिकाºयांनी मांडले.

पटोलेंचा भाजपावर परिणाम नाही
पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात भाजपाला कितपत नुकसान झाले याचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. पटोले यांचा फक्त साकोली विधानसभा मतदारसंघात काहिसा प्रभाव
आहे. मात्र, तेथेही भाजपाचे कार्यकर्ते मागे हटणार नाहीत, असेही आमदारांनी ठासून सांगितले.

Web Title:  The meeting of the Chief Minister took place, preparing to give an alternative to POLLENNA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.