पंचायत समिती कार्यालयात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:08 AM2021-05-01T04:08:45+5:302021-05-01T04:08:45+5:30
माैदा : तालुक्यातील वाढत्या काेराेना संक्रमणावर उपाययाेजना करण्यासाठी स्थानिक पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी (दि. ३०) आढावा बैठक घेण्यात आली. ...
माैदा : तालुक्यातील वाढत्या काेराेना संक्रमणावर उपाययाेजना करण्यासाठी स्थानिक पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी (दि. ३०) आढावा बैठक घेण्यात आली. यात रुग्णांची वाढती संख्या व त्यांच्यासाठी लागणाऱ्या सुविधांवर विचारविमर्श करण्यात आला.
तालुक्यातील काेराेना रुग्णसंख्या, सध्याची आराेग्यव्यवस्था व त्यांची कार्यपद्धती, काेराेना रुग्णांवर उपचाराची सुविधा व साधनांची आवश्यकता यांसह अन्य बाबी व समस्या साेडविण्यावर चर्चा करण्यात आली. संक्रमण राेखण्यासाठी काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविणे, या लसीबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करून त्यांना लस घेण्यासाठी माेठ्या संख्येने प्रेरित करणे, ऑक्सिजन सिलिंडर व औषधांची व्यवस्था करणे, माैदा येथील ग्रामीण रुग्णलयात काेराेना व अन्य आजारांचे रुग्ण तसेच प्रसूती महिला एकाच ठिकाणी गर्दी करीत असल्याने काेराेना संक्रमण वाढू नये म्हणून यावर उपाययाेजना करणे, लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी माेबाईल सेवा सुरू करणे, त्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी जनजागृती करणे, या उपाययाेजनांसाठी एनटीपीसीची मदत घेणे यांसह अन्य बाबींवर विचार करून निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे सभापती तापेश्वर वैद्य, तहसीलदार प्रशांत सागडे, खंडविकास अधिकारी दयाराम राठोड, तालुका आरोग्याधिकारी डॉ. रूपेश नारनवरे, मौद्याचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे, अरोलीचे ठाणेदार अशोक कोळी, महिला बालकल्याण अधिकारी खोब्रागडे उपस्थित होते.