बुटीबाेरी येथे शांतता समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:03+5:302021-03-28T04:08:03+5:30
बुटीबाेरी : पाेलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २६) शांतता समितीची सभा आयाेजित करण्यात आली हाेती. या सभेत आगामी सण, उत्सव ...
बुटीबाेरी : पाेलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २६) शांतता समितीची सभा आयाेजित करण्यात आली हाेती. या सभेत आगामी सण, उत्सव व काेराेना संक्रमण यांवर चर्चा करण्यात आली.
सध्या काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यातच मार्चमध्ये हाेळी, धुलिवंदन, एप्रिलमध्ये शिवजयंती, गुड फ्रायडे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती, आदी सण व उत्सव आहेत. या संपूर्ण सण व उत्सवकाळात काेराेना संक्रमण वाढू नये, याची प्रत्येकाने विशेष काळजी घ्यावी. सर्व सण घरी व साध्या पद्धतीने साजरे करावेत, घराबाहेर पडताना मास्कचा नियमित वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे, गर्दी करू नये, विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे यासह अन्य सूचना यावेळी देण्यात आल्या. सभेला एमआयडीसी बुटीबाेरीचे ठाणेदार विनोद ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे, पोलीस हवालदार विनायक सातव, सनी चव्हाण, संजय उताणे, आकाश इंगोले यांच्यासह परिसरातील गावांमधील पाेलीस पाटील व नागरिक उपस्थित होते.