कामठी येथे शांतता समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:09 AM2021-05-14T04:09:37+5:302021-05-14T04:09:37+5:30

कामठी : आगामी सण व उत्सव शांततेत पार पडावेत तसेच ते काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरणार नाहीत, यावर चर्चा करण्यासाठी ...

Meeting of the Peace Committee at Kamathi | कामठी येथे शांतता समितीची सभा

कामठी येथे शांतता समितीची सभा

googlenewsNext

कामठी : आगामी सण व उत्सव शांततेत पार पडावेत तसेच ते काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरणार नाहीत, यावर चर्चा करण्यासाठी कामठी शहरात नुकतीच शांतता समितीची सभा पार पडली.

या सभेत पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांनी आगामी सण-उत्सव काळातील विजेचे भारनियमन, कामठी शहरातील बंद असलेले पथदिवे, मुख्य मार्गावर पडलेले खड्डे, काेराेना संक्रमण यासह अन्य समस्या ऐकून घेत परिस्थितीचा आढावा घेतला. काेराेना संक्रमण लक्षात घेता प्रत्येकाने सण व उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करावे, काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, गर्दी करणे व राेडवर विनाकारण फिरणे टाळावे, मशिदीमध्ये नमाज अदा करताना पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत, याची काळजी घ्यावी, प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझरचा वापर करून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांनी केले. या सभेला कामठी (जुनी), कामठी (नवीन) या ठाण्यांचे ठाणेदार, पाेलीस अधिकारी व शहरातील नागरिक उपस्थित हाेते. ठाणेदार विजय मालचे यांची प्रास्ताविकातून सभेच्या आयाेजनाची रूपरेषा स्पष्ट केली. सूत्रसंचालन दुय्यम पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके यांनी केले तर मयूर बन्सोड यांनी आभार मानले.

Web Title: Meeting of the Peace Committee at Kamathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.