खापा येथे शांतता समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:43+5:302021-04-14T04:08:43+5:30
खापा : आगामी सण, उत्सव व काेराेना संक्रमण लक्षात घेता खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीची नुकतीच ...
खापा : आगामी सण, उत्सव व काेराेना संक्रमण लक्षात घेता खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीची नुकतीच सभा घेण्यात आली. सर्व नागरिकांनी सण व उत्सव काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करून साजरे करावे तसेच काेराेना संक्रमण वाढले व कायदा आणि सुव्यवस्था धाेक्यात येईल, असे कृत्य कुणीही करू नये, असे आवाहन खापा पाेलीस ठाण्याचे ठाणेदार तथा सहायक पाेलीस निरीक्षक अजय मानकर यांनी केले.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जात असून, ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयाेजन केले जाते. काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत असल्याने कुणीही माेठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयाेजन करून नये. सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत केवळ पाच व्यक्तींनी बुद्धविहारात जाऊन बुद्धवंदनेचा कार्यक्रम घ्यावा. या कार्यक्रमात प्रत्येकाने मास्कचा वापर करावा तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करणेही अनिवार्य आहे, अशा सूचना ठाणेदार अजय मानकर यांनी दिल्या. कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पाेलीस प्रशासनाच्या वतीने सर्व उपाययाेजना करण्यात येणार असून, नागरिकांनी पाेलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या सभेला नगरसेवक नामदेव गजभिये, पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे, यादव होनेराव, मंगेश म्हसने, अशोकसिंग ठाकूर, संजय वानखेडे, प्रमोद बन्सोड, मुकुंदा लोंडे, विजय बारई यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते.