रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक
By admin | Published: August 31, 2015 02:49 AM2015-08-31T02:49:26+5:302015-08-31T02:49:26+5:30
मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक नुकतीच डीआरएम कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.
विविध सूचना : प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या सुविधा
नागपूर : मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक नुकतीच डीआरएम कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. बैठकीत सदस्यांनी रेल्वे समस्यांशी निगडित अनेक सूचना केल्या.
रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या अध्यक्षस्थानी ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह होते. त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकावर केलेल्या विकासकामांची माहिती दिली. प्रवाशांना बसण्यासाठी केलेली सुविधा, इ क्लास स्थानकांवर शौचालयाची व्यवस्था, रेल्वेस्थानक परिसराच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदारांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सणानिमित्त पुणे-कामाख्या दरम्यान विशेष रेल्वेगाडी, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी हावडा-नाशिक, वर्धा-देवळाली स्पेशल रेल्वेगाडी सुरू करण्यात आल्याचे सांगितले. बैठकीला ‘डीआरयुसीसी’चे सदस्य ब्रिजभुषण शुक्ला, दिलीप ठकराल, सतीश यादव, सतीश बंग, निखील कुसुमगर, सुनील मिश्रा, बळवंत मोरघडे, दामोधर मंत्री, विजय गुल्हाणे, हर्षवर्धन सिंघवी, जितेंद्र देसाई, प्रभाकर सुंचुवार, क्रिष्णकुमार पांडे, त्रिशरण मिश्रा उपस्थित होते.
यावेळी रेल्वेचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अतुल राणे, अप्पर मुख्य आरोग्य अधीक्षक डॉ. व्ही. के. आसुदानी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता परिवेश शाहू, वरिष्ठ विभागीय अभियंता डी. आर. टेंभुर्णे, वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दुरसंचार अभियंता मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता एस. एस. चौहाण, सहायक सुरक्षा आयुक्त संजय चौधरी, जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील उपस्थित होते.
आभार विभागीय वाणिज्य व्यवस्थापक संजय कुमार दाश यांनी मानले. (प्रतिनिधी)