चक्रधरपूर विभागातील मेगा ब्लॉक; टाटानगर ईतवारी एक्सप्रेसचे संचालन प्रभावित
By नरेश डोंगरे | Published: January 9, 2024 07:08 PM2024-01-09T19:08:36+5:302024-01-09T19:15:30+5:30
नागपूर ईतवारी टाटानगर एक्सप्रेस १५ आणि २२ जानेवारी २०२४ ला रद्द करण्यात आली आहे.
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या चक्रधरपूर विभागात सुरू असलेल्या विकास कामाचा परिणाम टाटानगर - ईतवारी - टाटानगर एक्सप्रेसच्या संचालनावर झाला आहे.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दपूम रेल्वेच्या चक्रधरपूर बिसरा दरम्यान झारसुगुडा-राऊरकेलाच्यामध्ये विकास कामांच्या अनुषंगाने मेगा ब्लॉक केला जाणार आहे. त्यामुळे या मार्गाने चालणारी टाटानगर ईतवारी टाटानगर एक्सप्रेस तसेच अन्य काही गाड्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे टाटानगर ईतवारी ही गाडी आधी ३० डिसेंबर २०२३ ला आणि ६ जानेवारी २०२४ ला बंद करण्यात आली होती. आता पुन्हा १३ आणि २० जानेवारीला ही गाडी रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागपूर ईतवारी टाटानगर एक्सप्रेस १५ आणि २२ जानेवारी २०२४ ला रद्द करण्यात आली आहे.