जलसंधारण विभागात मेगा पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:34+5:302021-07-04T04:06:34+5:30

नागपूर : राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने तब्बल १६० जलसंधारण अधिकाऱ्यांना उपविभागीय जलसंधारण अधिकारी या पदावर ...

Mega promotion in water conservation department | जलसंधारण विभागात मेगा पदोन्नती

जलसंधारण विभागात मेगा पदोन्नती

googlenewsNext

नागपूर : राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने तब्बल १६० जलसंधारण अधिकाऱ्यांना उपविभागीय जलसंधारण अधिकारी या पदावर पदोन्नती दिली आहे. यात नागपूर विभागातील ३६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांना दिलेली पदोन्नती हा चर्चेचा विषय ठरत आहे.

युती सरकारच्या काळात ग्रामविकास विभागासोबत संलग्न असलेला जलसंधारण विभाग स्वतंत्र करून मृद व जलसंधारण विभाग तयार करण्यात आला. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यात नागपूर जिल्ह्यात ९, वर्धा जिल्ह्यात ८, गोंदिया ६, भंडारा ६, चंद्रपूर ५ व गडचिरोलीतील २ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची संख्या लक्षात घेता, सदर रिक्त पदे भरण्याची कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने मागणी करून पाठपुरावा केला होता, त्या अनुषंगाने पदोन्नतीने आदेश जारी करण्यात आले आहेत.

- नागपूर जिल्हा परिषदेच्या ९ अधिकाऱ्यांचा समावेश

या पदोन्नतीच्या प्रक्रियेत नागपूर जिल्हा परिषदेच्या राम दशपुत्रे, धर्मेंद्र फुलवार, व्ही. पी. अहिरे, अयुब मोहंमद शेख, पी. एस. भेंडे, चित्रा बरडे, एस. जी. भुडके, सुनील माटे, जी. टी. काळकर या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

- पदोन्नतीमुळे झालेल्या रिक्त जागा भरा

या पदोन्नतीने राज्यात एकाच वेळी १६० जलसंधारण अधिकारी यांची पदे रिक्त झालेली असल्याने जलसंधारणच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तरी जलसंधारण अधिकारी यांची रिक्त पदे भरण्याची मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडे केली आहे.

Web Title: Mega promotion in water conservation department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.