आठवणीतील निवडणूक; ४० हजार खर्च व्हायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:59 PM2019-03-13T13:59:10+5:302019-03-13T14:01:01+5:30

लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यासाठी तयार आहेत. मात्र एक काळ होता जेव्हा अवघ्या ४० हजार रुपयांत निवडणूक लढली जायची.

Memories of elections; total expenditure is just rs 40 thousand | आठवणीतील निवडणूक; ४० हजार खर्च व्हायचे

आठवणीतील निवडणूक; ४० हजार खर्च व्हायचे

Next
ठळक मुद्देनिवडणूक प्रचार स्वच्छता मोहिमेचे माध्यमप्रभात फेऱ्या निघायच्या

कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यासाठी तयार आहेत. मात्र एक काळ होता जेव्हा अवघ्या ४० हजार रुपयांत निवडणूक लढली जायची. विशेष म्हणजे पन्नास साठच्या दशकात निवडणूक प्रचार हा स्वच्छता मोहिमेचे माध्यम असायचा.
९० वर्षाचा टप्पा ओलांडलेले माजी आमदार यादवराव देवगडे यांना तो काळ आजही स्पष्टपणे आठवतो. १९५२ आणि १९५७ च्या पहिल्या दोन लोकसभा निवडणूकांवर स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतिबिंब दिसून आले होते. दोन्ही निवडणूकांत कॉंग्रेसचाच विजय झाला होता. विरोधी पक्ष प्रभावी नव्हता. जनसंघ व हिंदू महासभेसोबतच समाजवादी जनाधार शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्याकाळी आजसारखा दारू आणि पैशांचा खेळ होत नव्हता. सर्वोदय मंडळाचे कार्यकर्ता व गांधीवादी प्रभातफेरी काढून जनतेत जायचे. ते जेथून जायचे, तेथे स्वच्छता मोहीम राबविण्यात यायची. उमेदवारदेखील घरोघरी जाऊन जनसंपर्कावर भर देत असत. जर रस्त्यात प्रतिस्पर्धी उमेदवार भेटला तर त्याच्याशी आत्मियतेने संवाद व्हायचा. पक्षाच्या विचारधारेला जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भिंतीवर लिहिले जायचे. लाऊडस्पीकरचादेखील मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा. मात्र थेट संपर्कावर जास्त भर असायचा. निवडणुकींचे चिन्ह असलेले बिल्ले वाटले जायचे व लहान मुलांमध्ये त्याचे प्रचंड आकर्षण होते, असे यादवराव देवगडे यांनी सांगितले.
तिकीट तेव्हादेखील कापले जायचे
पन्नासच्या दशकात यादवराव देवगडे सेवादलाचे कार्यकर्ता म्हणून शहराच्या राजकारणात सक्रिय होते. १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणूकीदरम्यान तत्कालिन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या नावाची शिफारस हायकमांडकडे केली होती. मात्र तिकीट अनसूयाबाई काळे यांना मिळाले होते. मला त्याचे अजिबात वाईट वाटले नव्हते. कॉंग्रेस कार्यकर्ता म्हणून मी मनाने पक्षाचे कार्य केले व काळे सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या, असे त्यांनी सांगितले. पक्षाने १९६७ साली पूर्व नागपुरातून तिकीट देऊन त्यांना विधानसभेत पोहोचविले. त्या वेळेत कॉंग्रेसच्या तिकीटावर विजय मिळाला होता, मात्र तेव्हा विदर्भवाद्यांचे प्रस्थ वाढले होते. १९६२ साली कॉंग्रेसला हरवत बापूजी अणे खासदार बनले होते.

Web Title: Memories of elections; total expenditure is just rs 40 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.