काय पुरुषांमध्येसुद्धा रजोनिवृत्ती असते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:09 AM2020-12-06T04:09:48+5:302020-12-06T04:09:48+5:30
पुरुषांमध्ये रजोनिवृत्तीला ‘एंड्रोपॉज’ म्हटले जाते. वाढत्या वयासोबतच शरीरामध्येही हॉर्माेनसंबंधी बदलांमुळे हे होते. यात ‘टेस्टोस्टेरॉन’ व ‘एंड्रोजन’च्या कमतरतेमुळे ‘हायपोगोनाडिज्म’ म्हटले ...
पुरुषांमध्ये रजोनिवृत्तीला ‘एंड्रोपॉज’ म्हटले जाते. वाढत्या वयासोबतच शरीरामध्येही हॉर्माेनसंबंधी बदलांमुळे हे होते. यात ‘टेस्टोस्टेरॉन’ व ‘एंड्रोजन’च्या कमतरतेमुळे ‘हायपोगोनाडिज्म’ म्हटले जाते. ही समस्या रुग्ण आणि डॉक्टरांसाठी गुंतागुंतीची ठरते. यावर ‘टेस्टोस्टेरॉन रिप्लेस्मेंट’ उपचार आहे. परंतु याचे ‘साईड-इफेक्ट’ लक्षात ठेवायला हवे.
-पुरुष रजोनिवृत्तीची लक्षणे कोणती?
शारीरिक, भावनिक आणि यौन संबंधाबाबतची लक्षणे दिसून येऊ शकतात. जसजसे वय वाढते तसतसे हॉर्माेनमध्ये बदल होतात. यामुळे आत्मविश्वास, उत्साहात, एकाग्रतामध्ये कमी येते. सोबतच झोप न होणे, लठ्ठपणा वाढणे, थकावट आणि नैराश्याची लक्षणेही दिसून येऊ शकतात. शारीरिक कमजोरी आणि मांसपेशीमध्ये सैलपणा येतो. हाडे कमजोर होतात. सेक्स करण्याची इच्छाही कमी होऊ लागते. काही पुरुषांमध्ये स्तन वाढण्याची समस्या निर्माण होते.
-एंड्रोपॉज आणि रजोनिवृत्तिमध्ये अंतर काय आहे?
े‘एंड्रोपॉज’ला सर्वच पुरुषांना तोंड द्यावे लागते असे नाही. यात पुरुषांचे प्रजनन अंग पूर्णत: काम करणे बंद करीत नाही. मात्र टेस्टोस्टेरॉनचा स्तर घटल्याने काही समस्या निर्माण होऊ शकतात.
-एंड्रोजन काय करते?
ेएंड्रोजन हे हॉर्माेन शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होतात. त्याला पुरुष हॉर्मोनही म्हटले जाते. हा हार्मोन पुरुषाला स्त्रीपेक्षा वेगळा बनवितो. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्रोजेन हार्मोन्स असतात. परंतु पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त आहे.
-एंड्रोजन रिप्लेसमेंटची गरज कधी पडते?
डॉक्टर लक्षणांवरून टेस्टोस्टेरॉनच्या तपासणीसाठी सकाळी १० वाजण्यापूर्वी रक्ताची तपासणी करण्यास सांगतात. या तपासणीच्या अहवालावरून समस्येचे निदान केले जाते. विशेष म्हणजे, थकवा आणि लैंगिक इच्छेचा अभाव हे बऱ्याच कारणांमुळे येऊ शकते.
-एंड्रोजन या टेस्टोस्टेरॉन थेरपीची फायदा काय?
यामुळे लैंगिक इच्छा, उत्साह वाढतो. नैराश्यची भावना कमी होते.
-थेरपीचे दुष्परिणाम?
थेरपीचे दुष्परिणाम फार कमी आहेत. काही लोकांना मुरुम येऊ शकतात. लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन वाढू शकतात. काही प्रकरणांमध्ये हृदय विकार आणि स्ट्रोक येण्याची शक्यता असते. प्रोटेस्ट कॅन्सर असल्यास ही थेरपी दिली जात नाही.
-टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना दिली जावी?
६० वर्षांनंतर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होणे स्वाभाविक आहे. यावरील उपचार गोळ्या, इंजेक्शन आणि जेलच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. जर हॉर्माेनचे प्रमाण खूप कमी असेल तर हॉर्माेन रिप्लेसमेंट थेरपी बदलण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. परंतु रुग्णाला हृदयाची समस्या असू नये. थेरपी घेतलेल्यांनी प्रोस्टेट कर्करोग तपासणी केली पाहिजे.
-पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होण्याचे मुख्य कारण काय?
पहिले कारण म्हणजे, वय वाढणे. पुरुषांच्या अंडकोषात दुखापत झाल्याचेही कारण असू शकते. कधीकधी मधुमेह, लठ्ठपणा, एड्स यासारख्या इतर आजारांमुळेही ही समस्या उद्भवू शकते. काहीवेळा औषधांच्या दुष्परिणामांमुळेही ही समस्या येऊ शकते. पीयूष ग्रंथी, जी मेंदूत असते आणि सर्व हॉर्माेन निर्माण करणाऱ्या अवयवांना नियंत्रित करते, तसेच टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर देखील प्रभावित करते.