आत्महत्येच्या उंबरठ्यावरील महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:11 AM2021-09-10T04:11:17+5:302021-09-10T04:11:17+5:30

-जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन सुमेध वाघमारे नागपूर : कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाचा गरजा वाढत आहे, यातून पुरुषांमध्ये ...

Men more than women on the verge of suicide | आत्महत्येच्या उंबरठ्यावरील महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक

आत्महत्येच्या उंबरठ्यावरील महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक

Next

-जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन

सुमेध वाघमारे

नागपूर : कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाचा गरजा वाढत आहे, यातून पुरुषांमध्ये मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. त्यांच्यात नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक आयुष्याला कंटाळले असल्याचे पुढे आले आहे. एप्रिल २०१७ ते ३१ एप्रिल २०२१ या कालावधीत ५४ टक्के म्हणजे, ७४६ पुरुष आत्महत्येचा उंबरठ्यावर होते.

कौटुंबिक कलह, ताणतणाव, विरह, अपयश, अवहेलना, व्यसन, न्यूनगंड, गरिबी असो की डोक्यावर कर्जाचा डोंगर यातून आलेल्या नैराश्यातून होणा-या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाने २०१० पासून जनजागृती सुरू केली. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय गजभिये यांनी प्रयोगिक स्तरावर आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम राबविणे सुरू केले. यातून मिळालेल्या माहितीनुसार, मागील चार वर्षांत १,३७० जणांनी आत्महत्येचा प्रयत्न किंवा विचार केला. यात सर्वाधिक, ७४६ पुरुष व त्या खालोखाल ६२४ महिला आहेत.

-४५ टक्के महिलांमध्ये आत्महत्येचे विचार

एका महिलेला दिवसभरात आई, पत्नी, बहीण, सून अशा अनेक स्वरूपातील भूमिका वठवाव्या लागतात. यामुळे तणाव येतो. दुसरे म्हणजे महिलांमध्ये हार्मोन बदलत असतात. या शिवायही अनेक कारणे आहेत, ज्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रमाण वाढत आहे. मनोरुग्णालयाच्या आकडेवारीवरून ४५ टक्के महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न किंवा त्यांच्या मनात विचार घोळत होता. यात ४०च्या आत वयोगटातील महिलांची ४८८ आहे.

-११ ते ३० वयोगटातील विद्यार्थ्यांना सांभाळा

मुलांमधील सहनशीलता कमी होत असल्याने आत्महत्येच्या प्रयत्न किंवा मनात विचार घोळत असलेल्यांचा आलेख वाढत आहे. यात ११ ते ३० वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या चार वर्षात ११ ते २० या वयोगटात ३६, तर २१ ते ३० या वयोगटात १४ असे ५० विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते.

- पुरुष व महिलांसाठी तरुण वय भारी

कुटुंबांच्या गरजांचा भार, यातून निर्माण होणारे मानसिक संघर्ष, नैराश्य, चिंता याला सर्वात तरुण वर्ग बळी पडतात. परिणामी आत्महत्येचे विचार वाढतात. गेल्या चार वर्षांत ११ ते २० या वयोगटात ८०, २१ ते ३० वयोगटात ३६६, ३१ ते ४० वयोगटात ४०६ असे एकूण ८५२ तरुण आत्महत्येचा उंबरठ्यावर होते.

- डायल करा १०४ क्रमांक

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून नैराश्य व आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाणही वाढत आहेत. अशांसाठी १०४ हा हेल्पलाइन नंबर उपलब्ध आहे. येथील आरोग्य अधिका-यांशी बोलून मदत मागता येईल. या शिवाय प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वतीने सर्व जिल्हा रुग्णालायत सुरू करण्यात आलेल्या ‘प्रेरणा’ प्रकल्पातूनही मदत घेता येईल.

- डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

- वयोगटानुसार आत्महत्येचा विचार किंवा प्रयत्न करणा-यांची आकडेवारी

वयोगट : महिला : पुरुष

११ ते २० : ४४ : ३६

२१ ते ३० : २४४ : १२२

३१ ते ४० : २०० : २०६

४१ ते ५० : १५८ : १८२

५१ ते ६० : ६२ : ५२

६१ व त्यापुढील : ३८ : २६

Web Title: Men more than women on the verge of suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.