नागपुरात नाश्ता करताना मनोरुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:26 PM2018-03-20T23:26:40+5:302018-03-20T23:26:52+5:30

सकाळचा नाश्ता करीत असतानाच अचानक मनोरुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास प्रादेशिक मनोरुग्णालयात घडली. हा रुग्ण गेल्या सात वर्षांपासून रुग्णालयात उपचार घेत होता.

Mental patient death while taking lunch in Nagpur | नागपुरात नाश्ता करताना मनोरुग्णाचा मृत्यू

नागपुरात नाश्ता करताना मनोरुग्णाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालय : २०११ पासून घेत होता उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : सकाळचा नाश्ता करीत असतानाच अचानक मनोरुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास प्रादेशिक मनोरुग्णालयात घडली. हा रुग्ण गेल्या सात वर्षांपासून रुग्णालयात उपचार घेत होता.
संजय नागलकर (५५) रा. बुलडाणा असे रुग्णाचे नाव आहे. मनोरुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ८ मधून त्याच्यावर उपचार सुरू होते. नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांनी सकाळी ८.३० वाजता सर्व रुग्णांसोबत संजयलाही नाश्ता दिला. परंतु नाश्ता करीत असतानाच तो खाली कोसळला. अटेन्डन्सपासून ते डॉक्टर धावले. तपासणी केल्यावर मृत्यू झाल्याचे कळले. संजयच्या गळ्यात नाश्ता फसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. संजयला कुटुंबीयांनी मनोरुग्णालयात आणले तेव्हा तो फ्रॅक्चर होता. दरम्यान, रक्तदाब व लकव्यानेही त्याला ग्रासले होते. त्याला दोन्ही पायांनी चालताही येत नव्हते. दीर्घकाळापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. प्रशासनाने संजयच्या मृत्यूची सूचना मानकापूर पोलिसाना दिली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह मेयोत पाठविला आहे.
नातेवाईकांनी दिला चुकीचा पत्ता
संजयला मनोरुग्णालात भरती करताना कुटुंबीयांनी चुकीचा पत्ता दिला होता. २०१३ मध्ये संजय बरा झाला. मनोरुग्णालय प्रशासनाने त्याला त्याच्या पत्त्यावर घेऊन गेले. परंतु चुकीचा पत्त्यामुळे त्याला पुन्हा रुग्णालयात आणावे लागले. नियमानुसार दोन दिवसात नातेवाईक न आल्यास प्रशासनच संजयवर अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

Web Title: Mental patient death while taking lunch in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.