कळमना रेल्वेगेट सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यात आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:54 AM2019-01-10T00:54:41+5:302019-01-10T00:55:27+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या झोनल रेल्वे प्रवासी उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य प्रताप मोटवानी यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना कळमना मार्गावरील पगारिया लॉनजवळील रेल्वे गेटचा दुसरा भाग सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने हे गेट खुले केल्यामुळे व्यापारी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या झोनल रेल्वे प्रवासी उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य प्रताप मोटवानी यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना कळमना मार्गावरील पगारिया लॉनजवळील रेल्वे गेटचा दुसरा भाग सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने हे गेट खुले केल्यामुळे व्यापारी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
कळमना रेल्वे गेटबाबत नोव्हेंबर महिन्यात मोटवानी यांनी ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना या गेटमुळे व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याचे सांगितले होते. येथे दररोज वाहतूक विस्कळीत होत होती. त्यावेळी ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांनी नव्या वर्षात हे गेट खुले करण्याचे आश्वासन दिले होते. नव्या वर्षात रेल्वे प्रशासनाने हे गेट वाहतुकीसाठी खुले केले आहे. यामुळे कळमना बाजारात जाणाऱ्या हजारो व्यापाऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. हे गेट खुले केल्यानंतर प्रताप मोटवानी यांनी ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांची भेट घेऊन व्यापाºयांच्या वतीने त्यांचे आभार मानले. यावेळी मोटवानी यांनी इतवारी रेल्वेस्थानकावर पार्सल कार्यालय सायंकाळी ७.३० पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली होती. त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी पार्सल कार्यालयाची वेळ वाढविली असल्याचे मोटवानी यांनी सांगितले. यावेळी ‘डीआरयुसीसी’ सदस्य आनंद कारीया, मुरारीलाल शर्मा उपस्थित होते.