व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेज मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:10 AM2021-06-16T04:10:07+5:302021-06-16T04:10:07+5:30

- एनव्हीसीसीचे राज्यपालांना निवेदन : विधान परिषदेत व्यापाऱ्यांना प्रतिनिधित्व हवे नागपूर : लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट असून, त्यांना ...

Merchants should get financial package | व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेज मिळावे

व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेज मिळावे

Next

- एनव्हीसीसीचे राज्यपालांना निवेदन : विधान परिषदेत व्यापाऱ्यांना प्रतिनिधित्व हवे

नागपूर : लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट असून, त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, या आशयाचे निवेदन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधी मंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले. याशिवाय महाराष्ट्र विधान परिषदेत विदर्भातर्फे चेंबरला व्यापार प्रतिनिधी म्हणून सदस्यत्त्व देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

चेंबरचे अध्यक्ष म्हणाले की, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांची आघाडीची संघटना आहे. व्यापारी गेल्या वर्षीपासूनच लॉकडाऊनमुळे संकटात आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान मध्यम आणि लहान व्यापाऱ्यांना झाले आहे. सरकारने व्यापाऱ्यांना आर्थिक मदतीसाठी बजेटमध्ये आणि लॉकडाऊनच्या कालावधीत कोणत्याही आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली नाही. याशिवाय करांमध्ये व्यापाऱ्यांना कोणतीही सवलत दिली नाही. व्यापाऱ्यांनी आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी राज्यस्तरीय विशेष पॅकेज देण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी राज्यपालांकडे केली.

चेंबरचे उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा म्हणाले की, शासनातर्फे जनहितार्थ कल्याणकारी कार्याला कार्यान्वित करण्यासाठी नवनवीन योजना आणि उपक्रम तयार केले जातात. ते योग्यरीत्या कार्यान्वित होण्यासाठी शासन व सरकारमध्ये प्रत्येक क्षेत्रातील प्रतिनिधी असायला हवा. व्यापारी व्यवसाय करून स्वत:च्या कुटुंबाचे पालन पोषण करून रोजगाराचे साधन उपलब्ध करतो, तसेच कर सरकारच्या खजान्यात भरतो. आर्थिक वृद्धीदर आणि देशाच्या आर्थिक विकासात सहकार्य करतो आणि सामाजिक उपक्रमात हिरीरीने भाग घेतो. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविणे आणि त्यांच्या मागण्या विधान परिषदेत मांडण्यासाठी व्यापाऱ्यांतर्फे कुशल व तज्ज्ञ प्रतिनिधी असणे आवश्यक आहे.

सचिव रामअवतार तोतला म्हणाले की, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेत चेंबरचे माजी अध्यक्ष बी.सी. भरतीया आणि चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांना सदस्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, त्यामुळे व्यापाऱ्यांच्या समस्या मार्गी लागण्यास मदत मिळेल.

निवेदन देताना चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, संजय के. अग्रवाल, सचिव रामअवतार तोतला, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव उमेश पटेल, शब्बार शाकिर व जनसंपर्क अधिकारी राजवंतपाल सिंग तुली उपस्थित होते.

Web Title: Merchants should get financial package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.