नागपूरमध्ये पारा ४३ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 10:31 PM2021-04-28T22:31:08+5:302021-04-28T22:32:28+5:30
Temprature उपराजधानीत उन्हाळ्याची दाहकता जाणवायला लागली आहे. बुधवारी कमाल तापमानात १.४ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली व कमाल ४३.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. एप्रिलचे अखेरचे दोन दिवस पारा आणखी वर जाण्याची शक्यता आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत उन्हाळ्याची दाहकता जाणवायला लागली आहे. बुधवारी कमाल तापमानात १.४ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली व कमाल ४३.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. एप्रिलचे अखेरचे दोन दिवस पारा आणखी वर जाण्याची शक्यता आहे
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वातावरण कोरडे असल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढली आहे. बुधवारी कमाल तापमान सरासरीहून एक अंशाने अधिक होते. २३.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. सकाळी ८.३० वाजता आर्द्रता २९ टक्के होती. सायंकाळी हेच प्रमाण २० टक्के इतके झाले. आभाळदेखील निरभ्र होते व त्यामुळे तापमान वाढले. आठवडाभर अशीच स्थिती राहणार असून पारा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पारा ४० अंशांहून अधिक होता. ब्रह्मपुरीमध्ये कमाल तापमान ४४.४ अंश सेल्सिअस होते.