पारा खालावला, नागपूर थंडावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:07+5:302021-06-03T04:07:07+5:30
नागपूर : तीन दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात सतत घसरण होत आहे. बुधवारी ०.६ अंशाने तापमान किंचित वाढलेले असले तरी नागपूर ...
नागपूर : तीन दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात सतत घसरण होत आहे. बुधवारी ०.६ अंशाने तापमान किंचित वाढलेले असले तरी नागपूर मात्र थंडावले. सकाळी दाटलेले आभाळ आणि दिवसभरात ऊन -सावलीचा खेळ यामुळे पारा ३७.६ अंशावर होता.
सकाळी चांगलेच दाटून आले होते. त्यामुळे वातावरण थंडावले होते. सकाळी आर्द्रता ९८ टक्के नोंदविली गेली. तर सायंकाळी ती ६१ टक्के होती. विदर्भात मागील २४ तासात गडचिरोलीमध्ये २२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे बुधवारी तेथील तापमान चांगलेच खालावून ३२ अंशावर आले होते. वर्धा येथेही २३.६ मिमी पावसाची नोंद आहे. बुलडाणा आणि वर्धा येथे तापमान ३४ अंशावर होते. या सोबतच, चंद्रपूर ३५.६, गोंदिया ३६, यवतमाळ ३६.२, अकोला ३७ आणि अमरावतीमध्ये ३७.८ अंश सेल्सिअस नोंद झाली.