पारा खालावला, नागपूर थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:08+5:302021-06-03T04:07:08+5:30

नागपूर : तीन दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात सतत घसरण होत आहे. बुधवारी ०.६ अंशाने तापमान किंचित वाढलेले असले तरी नागपुर ...

Mercury dropped, Nagpur cooled | पारा खालावला, नागपूर थंडावले

पारा खालावला, नागपूर थंडावले

Next

नागपूर : तीन दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात सतत घसरण होत आहे. बुधवारी ०.६ अंशाने तापमान किंचित वाढलेले असले तरी नागपुर मात्र थंडावले. सकाळी दाटलेले आभाळ आणि दिवसभरात उन -सावलीचा खेळ यामुळे पारा ३७.६ अंशावर होता.

सकाळी चांगलेच दाटून आले होते. त्यामुळे वातावरण थंडावले होते. सकाळी आर्द्रता ९८ टक्के नोंदविली गेली. तर सायंकाळी ती ६१ टक्के होते. विदर्भात मागील २४ तासात गडचिरोलीमध्ये २२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे बुधवारी तेथील तापमान चांगलेच खालावून ३२ अंशावर आले होते. वर्धा येथेही २३.६ मिमी पावसाची नोंद आहे. बुलढाणा आणि वर्धा येथे तापमान ३४ अंशावर होते. या सोबतच, चंद्रपूर ३५.६, गोंदीया ३६, यवतमाळ ३६ .२, अकोला ३७ आणि अमरावतीमध्ये ३७.८ अंश सेल्सिअस नोंद झाली.

Web Title: Mercury dropped, Nagpur cooled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.