उपराजधानीत पारा पुन्हा घसरला, थंडी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:27 AM2019-01-29T10:27:39+5:302019-01-29T10:28:14+5:30
थंड हवेचे वारे पुन्हा एकदा नागपूरसह विदर्भात वाहू लागल्याने पारा घसरला आहे. परिणामी पुन्हा कडाक्याची थंडी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थंड हवेचे वारे पुन्हा एकदा नागपूरसह विदर्भात वाहू लागल्याने पारा घसरला आहे. परिणामी पुन्हा कडाक्याची थंडी वाढली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाºयांमुळे थंडी वाढली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील दिवस-रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा ५ ते ८ डिग्रीपर्यंत खाली घसरले आहे. नागपुरात मागील २४ तासात किमान तापमान ३.४ डिग्रीने खाली घसरले असून, १०.८ डिग्री सेल्सिअसपर्यंत आले आहे. नागपुरात दिवसभर कडक ऊन असूनही कडाक्याची थंडी कायम होती.
विदर्भात बुलडाणा येथील किमान तापमान ८.६ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. सोमवारी बुलडाणा विदर्भात सर्वाधिक थंड राहिले. हवामान विभागानुसार वाशीम ९.४, ब्रह्मपुरी १०.३, अमरावती, यवतमाळ १०.४, गोंदिया १०.८, चंद्रपूर १२ आणि गडचिरोली येथे १३.२ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. थंडीचा हा कडाका पुढील तीन ते चार दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याचे सांगणे आहे.